Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीत २२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची दुसर्‍या...

घाटंजी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीत २२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक..!

195

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील २६ ग्रामपंचायती मध्ये २२ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होऊ घातलेली आहे. दरम्यान, यवतमाळचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे १२/०२/२०२१ आदेशानुसार मुंबई ग्रामपंचायत निवडणुक नियम १९५९ चे कलम ३३ नुसार घाटंजीचे तहसीलदार पुजा एस. माटोडे यांची निवड केली आहे. तथापि, घाटंजी तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांची निवडणूक घेण्याकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून घाटंजीच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी (ग्रामपंचायत) पुजा एस. माटोडे यांनी एका आदेशानुसार अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे.
👉🏿 दुसऱ्या टप्प्यातील सरपंच व उपसरपंच यांची निवड 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी 10 ते 12 वाजे पर्यंत असुन, सभा मात्र दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. सरपंच व उपसरपंच निवडणूकीकरीता गांव निहाय अध्यासी अधिकारी खालील प्रमाणे –
👉🏿 जरंग – मंडळ अधिकारी व्ही. व्ही. सोळंके, देवधरी – मंडळ अधिकारी विजय मेश्राम, भांबोरा – मंडळ अधिकारी डी. बी. सुसरे, तरोडा – मंडळ अधिकारी एस. के. फुलमाळी, बोधडी – मंडळ अधिकारी ए. एम. बेलसरे, पांढुर्णा (बु) – मंडळ अधिकारी श्री. शिरभाते, तिवसाळा – मंडळ अधिकारी ए. सी. येरकर, वासरी – कृषी सहाय्यक समीर कोषटवार, कुऱ्हाड – कृषी सहाय्यक नितीन जरांडे, ससाणी – कृषी सहाय्यक लखन मेंडोले, जरुर – कृषी सहाय्यक कल्याण बेदरकर, पांढुर्णा (खु) – कृषी सहाय्यक अनिल बेजपवार, पाटापांगरा – कृषी सहाय्यक राजेश चांदुरकर, माजरी – तलाठी आर. डी. ठाकरे, चोरंबा – एस. एम. नांदगवळी, साखरा (खु) – तलाठी ए. डी. ओंकार, हिवरधरा – अव्वल कारकून (पुरवठा) एस. के. भिसे, मोवाडा – अव्वल कारकून आर. आर. बाबरे, मानोली – अव्वल कारकून एस. एस. दारुंडे, मांडवा – अव्वल कारकून एस. पी. बागडे, पार्डी (न) – तलाठी आर. के. मानकर, कोपरी (खु) – तलाठी पी. पी. वरठे, कवठा (खु) – तलाठी आर. जी. राठोड, माणुसधरी – तलाठी अरुण वानखडे, शिवणी – चेतन ठाकरे, किन्ही – बी. आर. तावडे आदींची सरपंच व उपसरपंच निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी (ग्रामपंचायत) पुजा एस. माटोडे यांनी नियुक्ती केलेली आहे.