Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील ५० ग्रामपंचायती मध्ये १८ व २२ फेब्रुवारी रोजी सरपंच व...

घाटंजी तालुक्यातील ५० ग्रामपंचायती मध्ये १८ व २२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची दोन टप्प्यात निवडणूक..!

269

◼️ तहसीलदार पुजा माटोडे यांचे आदेश….!

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील ५० ग्रामपंचायती मध्ये १८ व २२ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होऊ घातलेली असून, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे १२/०२/२०२१ च्या आदेशानुसार मुंबई ग्रामपंचायत निवडणुक नियम १९५९ चे कलम ३३ नुसार जिल्हाधिकारी यांनी घाटंजीचे तहसीलदार पुजा एस. माटोडे यांची निवड केली आहे. तथापि, घाटंजी तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांची निवडणूक घेण्याकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून घाटंजीच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी (ग्रामपंचायत) पुजा एस. माटोडे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे.
⚫ पहील्या टप्प्यातील सरपंच व उपसरपंच यांची निवड 18 फेब्रुवारी, तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी 10 ते 12 वाजे पर्यंत असुन, सभा मात्र दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. सरपंच व उपसरपंच निवडणूकीकरीता गांव निहाय अध्यासी अधिकारी म्हणून खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नांवे अशी :-
शिरोली – मंडळ अधिकारी व्ही. व्ही. सोळंके,
आमडी – मंडळ अधिकारी विजय मेश्राम,
कुर्ली – मंडळ अधिकारी डी. बी. सुसरे,
चिखलवर्धा – मंडळ अधिकारी एस. के. फुलमाळी
बेलोरा – मंडळ अधिकारी ए. एम. बेलसरे
मारेगांव – मंडळ अधिकारी श्री. शिरभाते
अंजी (नृसिंह) – मंडळ अधिकारी ए. सी. येरकर
सायतखर्डा – कृषी सहाय्यक समीर कोषटवार,
मुर्ली – कृषी सहाय्यक नितीन जरांडे,
कुंभारी – कृषी सहाय्यक लखन मेंडोले,
यरंडगांव – कृषी सहाय्यक कल्याण बेदरकर,
झटाळा – कृषी सहाय्यक अनिल बेजपवार,
⚫ इंझाळा – कृषी सहाय्यक राजेश चांदुरकर,
पिंपरी – तलाठी आर. डी. ठाकरे,
राजापेठ – तलाठी ए. डी. ओंकार,
पंगडी – अव्वल कारकून पुरवठा एस. के. भिसे,
सावरगांव – अव्वल कारकून आर. आर. बाबरे,
सावंगी (संगम) – अव्वल कारकून एस. एस. दारुंडे,
वाढोणा (खुर्द) – अव्वल कारकून एस. पी. बागडे,
खापरी – तलाठी आर. के. मानकर,
दहेगांव – तलाठी पी. पी. वरठे,
डोर्ली – तलाठी आर. जी. राठोड,
वघारा (टाकळी) – तलाठी अरुण वानखडे आदींची सरपंच व उपसरपंच अध्यासी अधिकारी म्हणून तर राखीव म्हणून कृषी सहाय्यक मदन सांगळे, अजय चव्हाण व विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.