Home नांदेड सिंदखेड येथे स.पो.नि.भालचंद्र तिडके यांनी केलं रक्तदान शिबीराचं उद्घाटन.

सिंदखेड येथे स.पो.नि.भालचंद्र तिडके यांनी केलं रक्तदान शिबीराचं उद्घाटन.

503

मजहर शेख, नांदेड

नांदेड/सिंदखेड,दि :१४:- शहिद दिन व छत्रपती शिवाजी महाराज व सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सिंदखेड येथिल समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन स.पो.नि. भालचंद्र तिडके यांनी केले.तसेच पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन, हार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून शिबीरास प्रारंभ झाला. त्यानंतर 51 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रमुख अतिथी वैधकीय अधिकारी डॉ.महाजन मॅडम,पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष चंदेल सर,शेकना गुंडावार,साहेबराव जाधव,आशीर्वाद आडावे,पत्रकार मजहर शेख उपस्थित होते.गोळवलकर गुरुजी रक्तकेंद्र ,नांदेड ची टीम यामध्ये बालाजी शिंदे,वैशाली भारती,अंबिका शिंदे यांनी परिश्रम घेतले.
आयोजक महेश कोटूरवार, अफरोज शेख हे होते तर शिबीराच्या यशस्वीतेसाठी अमोल राघेवार, राहुल जाधव,इद्रीस छाटीया,बाळू देशपांडे,राज कोटूरवार आदिंनी सहकार्य केले.