Home विदर्भ यवतमाळ शहरात दोन सिलेंडर चा स्फोट

यवतमाळ शहरात दोन सिलेंडर चा स्फोट

739

विनोद पञे

यवतमाळ , दि. ३० : – यवतमाळ शहरातील वंजारी फैलाच्या जवळ असलेला पिंपळगाव रोडवरील असलेल्या रोहीलेबाब झोपडपट्टीत दोन सिलेंडर चा स्फोट झाल्याची घटना घडल्याने यात चार घर जळून खाक झाली आहे .


या परिसरातील एका घरात चूल पेटवित असताना लिक झालेला सिलेंडरने जलत गतीने भडका घेतला व त्यामुळे सिलेंडर चा एका पाठोपाठ दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ५०० ते ६०० नागरीकांची दाट वस्ती मधील चार घर जळून खाक झाल्याने मोल – मजुरी करणारे नागरिक त्याचे राहते घर जळून खाक झाल्यामुळे रस्त्यावर आली आहे. दरम्यान या घटनेत एक मुलगा जखमी झाला असून जिवित हानी झालेली नाही .