Home विदर्भ भाजपा चे माजी आमदार राजू तोडसाम यांना कारावास

भाजपा चे माजी आमदार राजू तोडसाम यांना कारावास

459

पांढरकवडा / यवतमाळ , दि. २२ : – २०१३ साली महावितरण कार्यालय पांढरकवडा येथिल लेखापालास अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण प्रकरणी कानिष्ठ न्यायालयाने २०१५ साली माजी आमदार राजू तोडसाम यांना सूनावलेली ३ महिने कारावासाची शिक्षा काल जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडा ने कायम केल्याने तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली . दि. १७/१२/२०१३ ला काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी राजु तोडसाम आपल्या समर्थकासह विज वितरण कार्यालयात गेले होते तेथील लेखापाल विलास आकोट यांचेशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादवी २ ९ ४,३५२,३५३,५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता कानिष्ठ न्यायालयात सदर प्रकरणी १० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या असुन दिनांक २७/११/२०१५ ला राजु तोडसाम यांना कलम २९४ मध्ये ३ महिने साधा कारावास आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिने कारावास तर कलम ३५२ मध्ये ३ महिने साधा कारावास आणि ५०० रु दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस अधिक चा कारावास सुनावला होता हि शिक्षा सुनावली तेव्हा राजू तोडसाम आर्णी विधानसभा आमदार होते .

या प्रकरणातील माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात शिक्षे विरोधात अपिल दाखल केले होते . तसेच या प्रकरणी ३ वर्षांनी काल अतिरिक्त सत्र न्यायाधीश पि . बि . नाईकवाड यांनी कानिष्ठ न्यायालय पांढरकवडा चा आदेश कायम ठेवला . आदेश येताच माजी आमदार स्वतःहून पोलीस स्टेशन ला आल्याने पांढरकवडा पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करीत राजु तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी केली . यावेळी शासना कडून सरकारी वकील आर.डी. मोरे यांनी तर राजु तोडसाम यांचे तर्फे ऍड.गणेश धात्रक यांनी काम पाहिले तर संतोष राऊत हे पैरवी अधिकारी म्हणून उपस्थित होते . उद्या आपण नागपुर उच्च न्यायालयात या शिक्षे विरोधात धाव घेणार असल्याचे माजी आमदार राजु तोडसाम यांनी सांगितले . सदर शिक्षे मुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .