Mon. Jan 27th, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

संदिप मधूसूदन पाटील यांना “भारतरत्न मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

शरीफ शेख

रावेर , दि. १६ :- जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर येथील उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना “भारतरत्न मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९” जाहीर झाला आहे.संदिप पाटील यांनी या अगोदर ढेकू खुर्द,बिलवाडी या गावांमध्ये सेवा केली असून पढाई पे चर्चा,शाळा आपल्या दारी,दप्तरमुक्त शनिवार,स्वच्छतेचे महत्व असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.संदिप पाटील यांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव व्हावा व प्रेरणा मिळावी यासाठी पुरस्कार जाहीर केला असल्याचे मौलाना आझाद समाज विकास फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख,समनव्यक प्रवीण पाटील यांनी कळविले आहे.पुरस्काराबद्दल संदिप पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.संदिप पाटील यांना या अगोदर देखील विविध पूरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Posts Slider

AFTN Social

error: Content is protected !!