Home विदर्भ बेलगाम युवकांचा धुमाकूळःएसटी बसच्या काचा फोडून चालक प्रवाशास शिवीगाळ

बेलगाम युवकांचा धुमाकूळःएसटी बसच्या काचा फोडून चालक प्रवाशास शिवीगाळ

211

कुशल भगत – आकोट 

अकोला – तेल्हारा-अकोला या एसटी बसला चोहट्टा बाजार नजीक बेलगाम युवकांनी अडवत गाडीच्या काचा फोडल्या तसेच गाडीतील चालक व महिला प्रवाशास शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी दरम्यान घडली. याप्रकरणी तेल्हारा एसटी डेपो च्या चालकाने दहीहांडा पोलीस स्टेशन येथे बेलगाम युवकांविरुद्ध तक्रार दिली असून यातील चार आरोपींविरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा शिवीगाळ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी चालक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर चालक तेल्हारा ते अकोला बस चोहट्टा बाजार जवळील देवर्डा टाकळी रोड वरून घेऊन जात असताना 4 इसमांनी बस अडवुन बसचा चालक व महिला प्रवाशास शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर या बेलगाम युवकांनी बसच्या काचा फोडून एसटीचे अंदाजे पाच हजार रुपये नुकसान केले. या घटनेची पोलिसांनी माहिती मिळतात एसटी बस कडे धाव घेतली.या घटनेची पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या सदर प्रकरणी पोलीस दहीहांडा पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध कारवाई करत गुन्हे दाखल कलेत. या बेलगांव युवकांच्या धुमाकूळाच्या घटनेने चोहट्टा बाजार गावात विविध चर्चांना ऊत आला होता.