Home विदर्भ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ यवतमाळ जिल्हा कार्यालयाचे थाटात उदघाटन…!

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ यवतमाळ जिल्हा कार्यालयाचे थाटात उदघाटन…!

234

घाटंजी / यवतमाळ‌ , (अयनुद्दीन सोलंकी ) – शुक्रवारी १ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्ह्या ग्रामसेवक संघाच्या कार्यालयाचे थाटात उदघाटन ग्रामसेवक संघाचे राज्य उपाध्यक्ष रविकांत रेहपपाडे (नागपुर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी नागपूर विभागाचे विभागिय अध्यक्ष विलासजी मुंडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत भर्रे, हरीदास रानडे व ईतर मान्यवर उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकाच्या विविध समस्या व त्या अनुषंगाने जाहीर सभा घेण्यासाठी एक अधिकृत कार्यालय बांधण्याची संकल्पना यवतमाळ जिल्ह्यातील समस्त ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची होती. या अनुषंगाने ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मध्ये संघाचे कार्यालय स्थापन करण्यात आले. या शुभमुहूर्तावर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनी ग्रामसेवक संघामध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये ग्रामविकास अधिकारी तथा पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश गणवीर, राजपाल गुजर, सुनील उमरतकर, रवीभाऊ खंडारे, श्री. चिंतावार, मंगल आंबूरे (राळेगाव), किरणताई अंडस्कर मॅडम, सीमाताई उबाळे मॅडम, विजयाताई पाटील मॅडम, गोरटे मॅडम, वसंत वडस्कर, श्री. मोकशे, यु.एम. माने, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रदीप देशमुख, दादराव राठोड, या सह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक आदींनी ग्रामसेवक संघात प्रवेश घेतला. या कार्यक्रमासाठी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र महल्ले, सरचिटणीस लक्ष्मण नागरगोजे, कार्याध्यक्ष रतनलाल अग्रहरी, श्रीकांत बन्सोड, महेश मंचलवार, योगेश पाटील माहोरे, सुधीर क्षीरसागर, राजेंद्र खरतडे, श्यामकुमार राठोड, विनोद मोरे, प्रशांत कांडलकर, श्री. कोरके साहेब,दुधे साहेब, शेळके साहेब, श्री. माळोदे साहेब, प्रेमभाऊ डाखोरे, प्रवीण नामदेववार, प्रशांत पथाडे, मंगेश मरकाम, गणेश सुगदे, विजय उईके, हनुमंत गिरीगोसावी, मिलिंद माने, वणी शाखा अध्यक्ष टेकाम, देवेंद्र मेश्राम, श्री. शेंडे, देवकुमार गोंडाणे, गजानन घोरदडे, सुजित थुल, सुभाष ढोमणे. गायत्री मेश्राम या सह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ईत्यादी हजर होते. 

या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष रविकांत रेहपपाडे म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे कोणतीही समस्या प्रलंबित राहणार नसून, यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सर्व ग्रामसेवक यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी आवर्जून सांगीतले. यावेळी ग्राम सेवक सहकारी पतसंस्था गेली अनेक वर्षापासून काही विशिष्ट मूठभर लोकांच्या हातांमध्ये होती. त्यामुळे सामान्य सभासदाचे शोषण झाले. म्हणून सदरची पतसंस्था भरभराटीस आणण्यासाठी परिवर्तन पँनलची घोषणा केली. परिवर्तन पॅनल चे समन्वयक म्हणून श्री. नागरगोजे साहेब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी रमेश गणवीर (कळंब)यांच्या निवडीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पदोनत्ती झालेल्या सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकाने संघटन मजबूत करून राजेंद्र महल्ले आणि लक्ष्मण नागरगोजे यांच्या सोबत राहावे. निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कमी पडणार नाही, असे शेवटी रविकांत रेहपपाडे यांनी ठामपणे सांगितले.
जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिशय आनंदाचे वातावरण होते. असे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र वरफडे, कैलास आडे, विनोद मोरे आदींनी कळविले आहे.