Home विदर्भ सेवानिवृत्तीच्या दिवशी निरोप देतांना पंचायत विस्तार अधिकारी शांताराम सरगर यांना जिल्हा परिषदेचे...

सेवानिवृत्तीच्या दिवशी निरोप देतांना पंचायत विस्तार अधिकारी शांताराम सरगर यांना जिल्हा परिषदेचे सिईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते 13 लाख 35 हजार रुपयाचा उपदान धनादेश प्रदान

199

🟣 ऐतिहासिक घटनेबद्दल विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने सिईओचे जाहीर आभार….!

 अयनुद्दीन सोलंकी 

घाटंजी / यवतमाळ – दारव्हा पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेले पंचायत विस्तार अधिकारी शांताराम सरगर हे नियत वयोमाना नुसार 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उपदान रक्कमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे हे प्रामुख्याने उपस्थित होते. निरोप समारंभाच्या वेळी सेवानिवृत्तीच्या उपदानाची रक्कम रु. 13 लाख 35 हजार रुपयाचा धनादेश सेवानिवृत्त पंचायत विस्तार अधिकारी शांताराम सरगर यांना या प्रसंगी देण्यात आला. या निरोप समारंभात विस्तार अधिकारी आर. एन. चंदनकर, श्री. निवल व इतर विस्तार अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्हा परिषदेत आज पर्यंतच्या इतिहासात सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शन केस मंजूर करून उपदानाची रक्कम देणारी ही पहिलीच घटना आहे, हे येथे उल्लेखनीय. या अभिनव उपक्रमाबद्दल विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रमेश केळकर, सचिव रमेश जारंडे, कार्याध्यक्ष योगेश्वर ऊडाखे, टि.डी.चव्हाण, श्री. पंडित, श्री. जाधव, संतोष डाखोरे, प्रफुल्ल ठेंगेकर, जी. आर. इंगोले, डी. टी. मुनेश्वर, अविनाश पोपळकर यांचेसह इतर विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे जाहीर आभार मानण्यात आले. तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गुडधे सह पंचायत विभाग, जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानण्यात आले. असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरुण भोयर यांनी कळविले आहे.