Home नांदेड भाग्यनगर पोलिसांची मोठी कार्यवाही; दोन चोरट्यांकडून मोबाईल चोरीचा मोठा ऐवज जप्त.

भाग्यनगर पोलिसांची मोठी कार्यवाही; दोन चोरट्यांकडून मोबाईल चोरीचा मोठा ऐवज जप्त.

213

मजहर शेख, नांदेड

नांदेड ,दि : २०:- नांदेड येथील भाग्यनगर पोलिसांनी दोन चोरट्याना पकडून त्यांनी चोरलेले ४२ मोबाईल,एल ई डी टीव्ही,दोन कॅमेरे आणि स्कुटी जप्त केले आहे.
नांदेड शहरात होणाऱ्या विविध चोऱ्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिलेल्या कडक सुचनांना अमलात आणत सर्वच पोलीस चोरट्यांच्या मागे लागले.तेव्हा भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ जाधव गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी शेळके,गर्दनमारे,जायभाये, कदम आदींनी त्यांच्या माहितीत असणाऱ्या अस्लमखान आगाखान,राहणार धनेगाव,आणि इरफान खान राहणार वाजेगाव,या दोघांना पकडले.या चोरट्याकडून त्यांनी चोरलेले ४२ मोबाईल,एल ई डी टीव्ही,दोन कॅमेरे आणि स्कुटी जप्त केला आहे. हा सर्व ऐवज चोरीचा असलयाची कबुली चोरट्यांनी दिली आहे.पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर यांनी भाग्यनगर पोलिसांचे कौतुक केले आहे.