Home विदर्भ 52 हजार पाचशे रूपयाच्या मुद्देमालासह मोहाचा दारू साठा पकडला , “देवळी पोलीसांची...

52 हजार पाचशे रूपयाच्या मुद्देमालासह मोहाचा दारू साठा पकडला , “देवळी पोलीसांची कार्यवाही”

168

योगेश कांबळे

देवळी – दिघी शिवारात लोखंडे यांचे शेताजवळ नाल्यात अवैध रित्या दारू गाळत असल्याची गुप्त माहिती देवळी पोलीसांना प्राप्त होताच 

पोलीस हवालदार मनोज नांदुरकर यांनी टाकलेल्या धाडीत मोहाचा सडवा असलेले पाचपेक्षा अधिक ड्राम आढळून आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच झाडा झुडपांचा आसरा घेत आरोपी फरार झाला. पोलिसांनी 5 लोखंडी ड्रम दोनशे प्रति लिटर या प्रमाणे एक हजार लिटर दारू उध्वस्त केली असून त्याची किंमत 50 रु प्रति लिटर असा पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल आणी 5 ड्रम ची किंमत 500 प्रति ड्रम या प्रमाणे 2 हजार पाचशे रु. असा 52 हजार 500 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अज्ञात आरोपी विरोधात देवळी पोलिसात 66 मुबंई दारूबंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्म चारी सुरेश मडावी मेजर, चंदू राऊत, मनोज नांदुरकर, ब्रह्मनंद मून, राजू कुरसंगे, दयाल धवणे यांनी कारवाई केली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.