Home विदर्भ कोरोना योध्यानसाठी मनसेची यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक…..

कोरोना योध्यानसाठी मनसेची यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक…..

154

कोरोना काळात सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयातील कामगारांना कामावरून कमी केले…

कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १६० कामगारांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता कांबळे यांनी कामावरून कमी करण्याचे आदेश दिलेत या अन्यायाच्या विरोधात या कामगारांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांना सेवेत ठेवून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याच्या मागणी साठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात सर्व कामगार न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
एकीकडे शासन कोरोनाचा दुसरा टप्पा येणार याची माहिती देत सुटलं असताना अत्यंत भयानक परिस्थितीत सेवा देणाऱ्या म्हणजे कोरोना रुग्णाच्या मृतदेह उचलणे, संडास बाथरूम साफ करणे, त्यांची काळजी घेणे यासह सर्व कायम स्वरूपी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम कमी रोजंदारीत करणाऱ्या या कामगारांना अधिष्ठाता कांबळे यांनी तडकाफडकी कामाहुन कमी केले. वास्तविकतेत कोरोना वाढणार असे असताना या कामगारांची गरज असतांना सुद्धा त्यांना का कमी करण्यात आले असा असा सवाल या कामगारांनी अधिष्ठता यांना विचारले असता मी माझ्या मनाने पाहिजे त्यांना ठेवील असे प्रकारचे उत्तर या कामगारांना देण्यात आले.एकीकडे त्यांचा २ महिन्याचा पगार सुद्धा त्यांना देण्यात आला नव्हता त्यांची दिवाळी ही अंधारात टाकून त्यांना कामाहून कमी करण्यात आले आणि त्यांच्या जागी नव्याने आपल्या मर्जीतील लोकांना अधिष्ठाता ठेवत आहे असा आरोप कामगारांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केला. या प्रसंगी बोलताना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या कामगारांचा रोजगार त्या परत द्यावा तसेच अत्यंत वाईट काळात साथ देणाऱ्या या कोरोना योद्धय्यांनाचा सन्मान करत त्यांना येणाऱ्या काळात शासनाच्या इतर सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली .या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी जिल्हाधिकारी यांना या कामगारांना न्याय द्यावा अन्यथा मनसे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असुन वेळप्रसंगी मनसे आंदोलनाची भूमिका घेईल असा इशारा देण्यात आला.या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी यांनी या सर्व प्रकरणाचा अहवाल घेऊन या कामगारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते.या ठिकाणी कामगारांनी सुद्धा आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना ऐकविल्या. या प्रसंगी प्रामुख्याने विकास पवार, अमित बदनोरे, विलास बट्टावार, परीक्षित राणे, मयूर मेश्राम यासह शेकडो कामगार युवक महिला उपस्थित होत्या.