Home महत्वाची बातमी
102

प्राचार्याने प्राध्यापिकेला केली शरीर सुखाची मांगणी ,

अमीन शाह

अकोला ,

मूर्तिजापूर गाडगे महाराज महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य यांनी पदाचा दुरुपयोग करीत महिला प्रधापयक यांची विविध कामात अडवणूक करीत शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या तक्रारीवरून प्राचार्य विरुद्ध आज , स्थानिक सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
प्राप्त माहितीनुसार महिला प्राध्यापक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , त्या येथील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत . त्याच महाविद्यालयातील प्राचार्य संतोष माधव ठाकरे ( वय ५६ ) हे हेतुपरस्पर माझ्यावर वाईट नजर ठेवून माझ्यासोबत वाईट इराद्याने जवळीक साधून संबंधाची मागणी करीत , न केल्यास तुमचे प्रमोशन , विविध मिळणारे भत्ते , पगारवाढ यात अडथडळे आणीत मानसिक त्रास देत असल्याची फिर्याद दिली . या फिर्यादीवरून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राचार्य संतोष ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सिटी पोलिस ठाण्याचे महिला सहायक निरीक्षक संगीता गावडे करीत आहे .