Home विदर्भ गणगावच्या अडाण नदीमधुन रेती चोरी सुरूच

गणगावच्या अडाण नदीमधुन रेती चोरी सुरूच

162

 

देवानंद जाधव

यवतमाळ – आर्णी तालुक्यातील गणगाव च्या अडाण नदीमधुन दररोज असंख्य ट्रॅक्टर रेती चोरी केली जात आहे. रेती चोर गणगाव रेती घाटाकडे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणुन बघत आहे. शिवाय गणगावात लाखो रुपयांच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे,

त्यासाठी देखील अडाण नदीच्या आणि नाल्यातुन चोरुन आणलेल्या रेतीचा अमर्याद वापर केला आहे. सोबतच तरोडा ते गणगाव रोडच्या दरम्यान अलीकडेच बांधकाम करण्यात आलेल्या पुलासाठी सुध्दा चोरीची रेती वापरली गेली आहे. रेती चोरी साठी रेती चोर विना क्रमांकाचे ट्रॅक्टरचा ऊपयोग करतात हे विशेष. या निमित्ताने गेले आर.टी. कुणीकडे?असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. पाण्याच्या टाकीचा आणि तरोडा गणगाव रस्त्याचा कंञाटदाराने केलेल्या कामाचे आणि सदर कामाला लागलेल्या रेतीचे मुल्यांकन करुन शासकीय नियमानुसार दंडीत करावे, अशी मागणी परिसरातील पर्यावरण प्रेमी कडुन होत आहे. सदर रेती चोरी गणगावच्या बंजरंगबली मंदीराजवळील उजव्या हातावर असलेल्या रेती घाटावरुन होत आहे. याकडे आरणी महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. गणगाव रेती घाटावरुन यवतमाळ, आरणी.,दारव्हा तालुक्यात खुलेआम रेती चोरी सुरू आहे. याचा आजच घेतलेला पुरावा प्रशासनाची झोप ऊडवणारा आहे. अडाण नदीचे लचके तोडण्याचे पाप करुन, पर्यावरणाचे लचके तोडण्याचे कृत्य गणगाव च्या अडाण नदीच्या रेती घाटावर सुरू आहे. सबंधीत महसूल कर्मचारी वर्गाला हाताशी धरून अडाण नदी लुटली जात आहे. त्यामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. सर्वञ धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे आरणी महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी कडुन होत आहे. रेती चोरांवर कारवाई तातडीने कारवाई करुन त्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी गणगाव परिसरातील जनतेकडून होत आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. शिवाय सबंधीत स्थानिक महसूल कर्मचार्यांना निलंबित करण्याची मागणी देखील जोर धरत आहे. यवतमाळचे कर्तव्य दक्ष जिल्हाधीकारी काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.