Home नांदेड डॉ . जगदीश कुलकर्णी सोलापुर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर

डॉ . जगदीश कुलकर्णी सोलापुर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर

191

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्राचे प्र . संचालक व ग्रंथपाल डॉ . जगदीश नरहरराव कुलकर्णी ( हाळदेकर ) यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापिठाच्या ग्रंथालय व माहितीशास्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नुकतीच नियूक्ती झाली आहे .

डॉ . जगदीश कुलकर्णी मागील एकवीस वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असून त्यांनी सहायक ग्रंथपाल, उपग्रंथपाल व ग्रंथपाल ( प्राध्यापक समकक्ष ) अशा विविध पदावर काम केलेले आहे . मागील आठ वर्षापासून ते ज्ञान स्त्रोत केंद्राचे ( विद्यापीठ ग्रंथालयाचे ) प्रमुख म्हणून काम पाहत असून या काळात ग्रंथालयाने भरीव प्रगती केली आहे . स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा . कुलगुरू डॉ . उध्दवजी भोसले व प्र कुलगुरू डॉ . जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनात ग्रंथालयातील प्रबंध डिजीटायझेशन विशेषतः युजीसी ईन्फ्लिबनेटच्या शोधगंगा व शोधगंगोत्री प्रकल्पात उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे .
विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य, ज्ञान स्रोत समितीचे सदस्य सचिव व अशा विविध समितीवर त्यांनी काम केलेले आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व राजर्षी शाहू महाविद्यालय ( स्वायत्त ) लातूरच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळावर ते यापूर्वीच कार्यरत आहेत .
या नियुक्तीवर त्यांनी आनंद व्यक्त केला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ . उद्धवजी भोसले, प्र कुलगुरू डॉ . जोगेंद्रसिंग बिसेन, कुलसचिव डॉ . सर्जेराव शिंदे, सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, ज्ञान स्त्रोत समिती सदस्य व ज्ञान स्त्रोत केंद्रातील कर्मच्या -यांचे आभार मानले आहेत .

त्याच बरोबर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मा . कुलगुरु डॉ . मृणालिनी फडवणिस, मा . डॉ . मृणालिनी फडवणीस, प्र कुलगुरू डॉ . देवेंन्द्रनाथ मिश्रा, कुलसचिव मा . डॉ . विकास घुटे, सहायक कुलसचिव डॉ शिवाजीराव शिंदे यांचे दिलेल्या संधी बद्दल ऋण व्यक्त केले आहेत .