Home विदर्भ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टंराचे सामुहिक आंदोलन…..!

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टंराचे सामुहिक आंदोलन…..!

293

विनोद पञे 

 

यवतमाळ : – स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी शासकीय सेवेत कायमस्वरुपी नियुक्ती देण्याचे मागणीसाठी सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे . राज्यातील ६५० डॉक्टर्स यामध्ये सहभागी झाले आहेत . कोबिड -१९ या विषाणुजन्य महामारीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स जीवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा देत आहे . कोविड -१९ चा सर्व भार आपल्या अंगावर घेत हे सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक रात्र – दिवस आपले कर्तव्य पार पाडीत आहे . या पार्श्वभूमीवर शासनाने त्यांचे कामाची दखल घेऊन शासकीय नोकरीत कायमस्वरूपी सामावुन घ्यावे व स्थायी डॉक्टर्स प्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच नियमित डॉक्टर्स प्रमाणे अन्य सुविधा देण्यात याव्या या प्रमुख मागणीसाठी हया सर्व अस्थायी डॉक्टर्स आंदोलन करीत आहे . मागील ५ वर्षापासून हे सर्व सहाय्यक प्राध्यापक तात्पुरत्या स्वरूपात राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत . स्थायी डॉक्टर्स प्रमाणे कोठल्याही सुविधा त्यांना मिळत नाही . रजा मिळत नाही , वेतनवाढ नाही , पुढील नोकरीची शाश्वती नाही अश्या परिस्थितीत हे डॉक्टर्स आपली सेवा देत आहे . शासनाने २००९ व २०१६ ला अश्याप्रकारे अस्थायी स्वरूपात सेवा दिलेल्या सहाय्यक प्राध्यापकांना शासनाने समायोजन केलेले आहे . त्याच धर्तीवर निदान कोरोना काळात अविरतपणे सेवा देत असल्याने आमच्या सेवेची दखल घेऊन शासनाने सेवेत कायम करावे अशी त्यांची मागणी आहे . दिनांक ०२ नोव्हेबर पासून राज्यभरातील जवळपास ६५० अस्थाई सहाय्यक प्राध्यापक या संपामध्ये सहभागी झाले आहेत . शासन जोपर्यत सेवेत कायमस्वरूपी नियुक्तीचे आश्वासन देत नाही तोपर्यत सामुहिक रजा आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार सर्वानी व्यक्त केला . अश्या प्रकारचे निवेदन त्यांनी राज्याचे माननीय मुख्यंमत्री , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री माननीय अमित देशमुख , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे माननीय सचिव व वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे संचालक यांना सादर केले आहे . आज दिनांक ०४ नोव्हेबर ला सामाजीक दायित्वाचा एक भाग म्हणून या सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांनी आज रक्तदान केले आहे . या उपोषणाला माजी मंत्री माणिकराव ठाकरे तसेच माजी मंत्री व राळेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार अशोकराव ऊईके यांनी भेट देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंदोलनकरी डॉक्टरांना दिले . यामध्ये डॉ.सतिश पवार , डॉ.अरविद कुडमेथे , डॉ . शरद मानकर , डॉ.तेजस मडावी , डॉ . प्रशांत मेश्राम , डॉ . सचिन गरुड , डॉ . अनिकेत बुचे डॉ . चेतन जनबादे , डॉ . स्नेहल जुमनाके , डॉ . हर्षदा उघाडे , डॉ . दिपा तेलगोटे , डॉ.सुचिता टेकाम , डॉ.आर्शिया शेख , आदी डॉक्टर्स सहभागी झाले.