Home महत्वाची बातमी जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या , दोन जण ताब्यात

जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या , दोन जण ताब्यात

45
0

जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या , दोन जण ताब्यात

*पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात*

जळगाव : एजाज़ गुलाब शाह

येथील शिवाजीनगर भागात रहिवासी असलेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे यांचा रात्री 11:30 च्या सुमारास शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या पुढे उस्मानिया पार्क जवळ अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकाचे कर्मचारी यांनी 2 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हल्ला झाल्या नन्तर ओम क्रिटिकल हॉस्पिटलला राकेशला आणले असताना तिथे मृत घोषित करण्यात आले उशिरा पर्यंत हॉस्पिटल व पुढील तपास सुरु आहे रात्री उशिरा पर्यंत शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते घटनास्थडी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण कुमार मुंढे यांनी घटनेची माहिती घेतली .शहरात घटना ही मोठी घटना झाल्याने एकच खड़बड़ उडाली आहे