Home जळगाव इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर(स)यांच्या बद्दल अपशब्द वापरुन सर्व मुस्लिम समाजाची भावना...

इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर(स)यांच्या बद्दल अपशब्द वापरुन सर्व मुस्लिम समाजाची भावना दुखावल्याने…..

189

मुक्ताईनगर येथील फ्रान्स चे राष्ट्रपती इमॅन्युअर मॅक्रोन ची प्रतिमा जाळुन जाहीर निषेध करण्यात आले….

तहसिलदार साहेब यांना मुस्लिम समाज तर्फे निवेदन देण्यात आले…..

रावेर (शरीफ शेख)

फ्रान्स या देशातील एका नागरिक द्वारे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विटंबना करणारे कार्टून काढून सर्व मुस्लिम समाजाची भावना दुखावल्या गेली आहे. त्यात फ्रान्स चे राष्ट्रपती इमॅन्युअर मॅक्रोन यांनी त्या कार्टून ला फ्रान्स चे चौकात लावण्यात आदेश दिले आहेत.फ्रान्स चे राष्ट्रपती यांचे या निर्णयामुळे जगातील सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,त्यात राष्ट्रपती मायक्रॉन यांनीसुद्धा प्रेषित मोहम्मद पैगंबर बद्दल अपशब्द वापरले आहेत. भारतात देखील या निंदनीय प्रकारचा संपूर्ण जगात निषेध होत आहे.तसेच फ्रान्स देशाची भारतातून होणारे वस्तूचे इम्पोर्ट-एक्सपोर्ट बंद करण्यात यावे,व भारत सरकार यानी फ्रान्स सरकार ला हा आदेश मागे घेण्यास भाग पाडावे,अशी हा निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहेत.सदर निवेदन नायब तहसीलदार श्री प्रदिप झाबरे यांना निवेदन सादर करताना मुस्लिम मनियार बिरादरी चे शेख हकीम चौधरी, समाजिक कार्यकर्ते आसिफ शेख,सुन्नी मनियार मस्जिद चे मुतवली कलीम मनियार,शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान,अहमद ठेकेदार,वसीम कुरैशी,रिजवान चौधरी, अदि समाज बांधव उपस्थित होते.