
यवतमाळ – (प्रतिनिधी/वासीक शेख) यवतमाळ जिल्ह्यात गत २४ तासात ५२ जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत ७८९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ८९२० झाली आहे. तर आज ६३ जणांना सुटी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७६७३ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८४ मृत्युची नोंद आहे.जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत ७८७८८ नमुने पाठविले असून यापैकी ७७९६४ प्राप्त तर ८२४अप्राप्त आहेत. तसेच ६९०४४नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.










































