Home बुलडाणा जेष्ठ पत्रकार सय्यद रफिक यांचा फेसबुक अकाउंट हॅक करून अज्ञात हैकर ने...

जेष्ठ पत्रकार सय्यद रफिक यांचा फेसबुक अकाउंट हॅक करून अज्ञात हैकर ने केली पैशाची मांगनि ,

357

जेष्ठ पत्रकार सय्यद रफिक यांचा फेसबुक अकाउंट हॅक करून अज्ञात हैकर ने केली पैशाची मांगनि ,

 

अज्ञात हैकर विरोधात तक्रार दाखल ,

सायबर शाखेने तात्काळ तपास करावा ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

साखरखेर्डा येथील रहिवासी जेष्ठ पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते बुलडाना जिल्हा रोजगार हमी योजना चे माजी सदस्य सय्यद रफिक यांचा बऱ्याच वर्षा पासून फेसबुक वर अकाउंट असून ते या व्दारे समाज जण जागृती करीत असतात मात्र दोन दिवसा पूर्वी एक अजबच प्रकार घडला असून कोणी तरी अज्ञात इसमाने त्यांचा फेसबुक अकाउंट हैक केल्याचे लक्षात आले आहे त्यांचे अकाउंट हैक करून अज्ञात हैकर त्यांच्या मित्रांना पैश्याची मांगनि करीत आहे , या अज्ञात हैकर ने सय्यद रफिक यांचे मुंबई पुणे अचलपूर , जालना , मेहकर , चिखली , बुलडाणा , साखर खेर्डा येथील मित्रांना मेसेज करून मी अडचणीत असून मला पैश्याची आवश्यकता असल्याचे खोटे सांगून अज्ञात हैकर 7664860558 व 933917 8173 या नंबर वर पैसे टाकण्याचे सांगत आहे , काही मित्रांचे फोन येताच सय्यद रफिक यांनी आपल्या अकाउंट चे पासवर्ड बदलले मात्र बद्दलेले पासवर्ड सुद्धा त्याने पुन्हा हैक केले या प्रकरणी सय्यद रफिक यांनी अज्ञात हैकर विरोधात साखरखेर्डा पोलिसात तक्रार दाखल केली असून सायबर सेल ने या अज्ञात हैकर ला तात्काळ गजाआड करावे अशी मांगनी करण्यात आली आहे ,

*सावध रहा ,*

अज्ञात हैकर असे कोणाचे ही अकाउंट हैक करून पैश्याची मांगनि करू शकतो मी माझे फेसबुक अकाउंट तात्पुरते लॉक केले असून माझ्या नावाने जर कोणी आपणास काही पैसे मागत असल्यास त्याची तात्काळ तक्रार पोलिसात दाखल करा असे आवाहन ही जेष्ठ पत्रकार सय्यद रफिक यांनी केले आहे ,