
रावेर (शरीफ शेख)
जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ येथील मोहम्मदीया नगरातील रहिवाशी व स्थानिक गुन्हे शाखा(एलसीबीचे)पोहेकाॅ शरीफ काझी यांचे चिरंजीव मोहसीन शरीफ काझी यांची महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यानी केली आहे.या निवडीबद्दल मोहसीन काझी यांचे पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी व विविध स्तरातुन स्वागत केले जात आहे.











































