Home विदर्भ सिरसोलीतील २१ शेतकऱ्यांच्या शेतातील मोटरपंपाच्या वायरची चोरी

सिरसोलीतील २१ शेतकऱ्यांच्या शेतातील मोटरपंपाच्या वायरची चोरी

260

वर्धा / तळेगांव (शा.पं.) , ( रविन्द्र साखरे ) – तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आष्टी तालुक्यातील सिरसोलि येथील २१ शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पंपाचे वायर चोरीला गेल्याची तक्रार तळेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे .सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन त्यातच परिसरात मागील दोन आठवड्यापासुन सतत रिमझिम पाऊस सुरु आहे. तेव्हा शेतकर्‍यांचे शेतात रात्रीला रखवाली करीता जाणे बंद आहे. तर सध्या पावसामुळे शेतातील विहीर तसेच बोअर व नदीवरील मोटर पंप बंद आहे. यंदा सध्या पिक परीस्थिती चांगली असल्यामुळे शेतकर्‍यांचे सर्व लक्ष शेतातील पिकावर लागले आहे. याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला असुन सिरसोलि येथील २१ शेतकर्यांचे शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंपाची मल्टिस्टॅंड थ्री फेज ९७५ फूट केबल वायर अंदाजे किंमत १४,६२५ रुपये चोरी गेल्याची तक्रार सिरसोलि येथील शेतकरी मनिष पाथरे, आशिष वाघ, प्रमोद शहाणे, मनोहर कावळे,यानी तळेगांव पोलिस स्टेशन कडे धाव घेत तक्रार नोदविली असुन तळेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार रवी राठोड आपल्या सहकार्‍यांसह सिरसोली येथील घटना स्थळी पोहचुन पंचनामा केला असुन अज्ञात चोरांविरुद्ध विविध कल्मान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास तळेगाव पोलिस स्टेशनचे ठानेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.