Home मराठवाडा कळंब पोलीस ठाण्यात कोरोनाचा हाहाकार,तब्बल 15 पोलिसांना कोरोना…

कळंब पोलीस ठाण्यात कोरोनाचा हाहाकार,तब्बल 15 पोलिसांना कोरोना…

327

कळंब पोलीस ठाण्यात कोरोनाचा हाहाकार,तब्बल 15 पोलिसांना कोरोना…

-सलमान मुल्ला

कलंब

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब पोलीस ठाण्यातील 15 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अशी माहिती उपविभागीय कार्यकारी अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली आहे..

आज रॅपिड टेस्ट केल्यानंतर लागण झाल्याचे निदान झाले असून, यामुळे जिल्ह्यासह कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे. यात 13 पुरुष व 2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. आधीच कमी मनुष्यबळावर पोलीस काम करत असताना आता त्यात 15 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने ताण वाढणार आहे.

कळंब पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण 80 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी काल 55 कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 15 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
तर औरंगाबाद येथील दिनांक 21 ऑगस्ट रोजी प्राप्त रिपोर्ट्स नुसार कळंब तालुक्यात आणखी 13 रुग्णांची भर पडली आहे यामध्ये कळंब शहर 4,देवधानोरा 4,माळकरंजा 1,पिंपळगाव डोळा 1,लोहटा पुर्व 1, तर इटकुर गावात 2 रुग्ण आढळले आहेत…