Home नांदेड कोरोणा रोगाने मयत महीलेचा न.पं.माहूर कडून अंत्यविधी !

कोरोणा रोगाने मयत महीलेचा न.पं.माहूर कडून अंत्यविधी !

203

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि.  २३ :-  माहूर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील रहिवाशी असलेल्या माहूर येथे त्यांचे नातु रामेश्वर केंद्रें यांच्याकडे राहत असलेल्या श्रीमती बयाबाई दगडू मुंढे (वय 90 वर्ष) यांना कोरोणा रोगाची लागण झाल्याने माहूर येथील कोविड केअर सेंटर येथे काल दिनांक 22-08-2020 रोजी सायंकाळी भरती केले असता त्यांची तब्बेत बिघडत होती म्हणुन तात्काळ त्यांना रात्री 01-00 वाजता नांदेडला पाठविले असता महागाव च्या जवळपास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांना परत माहूर येथे आणण्यात आले.वैद्यकीय अधीक्षक डॉ.भोसले यांनी त्याच वेळी रात्री 2-25 ला नगर पंचायत माहूर चे कार्यालय अधिक्षक वैजनाथ स्वामी,यांना भ्रमणध्वनी वरुन माहीती दिली. स्वामी यांनी रातोरात कर्मच्यार्यांना सुचना देऊन अंत्यविधीची तयारी केली आणी आज दि.23 रोजी सकाळी मात्रतिर्थ स्मशान भुमी येथे नगर पंचायत माहूर च्या वतीने मुख्याधिकारी तथा तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी प्रेतास स्वत: अग्नी दिला.
यावेळी ग्रामिण रुग्णालय माहूरचे अधिक्षक डॉ.भोसले, पो.हे.कॉ.विष्णू मुटकुळे, नगर पंचायत माहूर चे कर्मचारी सुरेंद्र पांडे,गणेश जाधव,शेख शब्बीर भाई,गजानन देवकते,पिंटू चव्हाण व मयत महीलेचे नातेवाईक रामेश्वर केंद्रें सह ईतर नातेवाईक उपस्थित होते.