
शिरीहरी अंभोरे पाटील ,
हिंगोली ,
वसमत गेल्या चार दिवसा पासुन सुरू असलेल्या रिप रिप पावसामुळे शहरातील प्रभाग क्र 2 च्या रस्त्यात जागोजागी पाणी साचले आहे.रस्ते नाली विद्युत खांब घरकुल पाणी नळ योजना अशा अनेक समस्या पासून वंचित असलेल्या प्रभाग आपणास पहावयास दिसत आहे तर प्रभाग 2 च्या नागरिकांना चिखलातून मागील कित्येक वर्षापासुन तारेवरची कसरत करावी लागते. ह्या प्रभागात विशेष म्हणजे आज शहरातील प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविकेचे प्रतिनिधी दिलीप भोसले व प्रभागातील नागरिकांनी रस्त्यातील चिखलात गाजर गवत लाऊन गांधीगिरी दाखवत आंदोलन केले.मागील काही दिवसापूर्वी प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी मुरुम टाकण्यासाठी नगर परिषदेस वेळोवेळी कळविले होते. परंतु सदरील बाबीकडे नगर परिषद डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले आहे. मुख्याधिकारी हे कार्यालयात बसुन काम पाहत असल्याने त्यांना शहरातील प्रभाग व प्रभागातील रस्ते माहीत नाहीत तर प्रभागातील रस्त्यांची अवस्था काय कळणार हे विशेष. म्हणून शासनाने आमच्या प्रभागाचा विकास करावा असी जनतेतून मागनी होत आहे. उपजिल्हा असलेल्या वसमत शहरास कार्यक्षम मुख्याधिकारी देण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत असल्याची चर्चा आहे.वसमतच्या काही प्रभागातील नगरसेवकांना आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे हि फार खेदाची बाब आहे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.











































