Home महत्वाची बातमी जिहाधिकारी यांच्या आदेशाला डावलून मलकापूर पांगरा येथे भरला आठवडी बाजार ,

जिहाधिकारी यांच्या आदेशाला डावलून मलकापूर पांगरा येथे भरला आठवडी बाजार ,

499

 

लोकांची एकच गर्दी ,

सोशल डिस्टनसिंग ची ऐसी तैसी ,

सिंदखेडराजा प्रतिनिधी ,

आज सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा या गावी फार मोठा बाजार भरला आहे बाजारात व्यापाऱ्यांनी अनेक दुकाने थाटली आहे येथे खरेदी साठी लोकांनी एकच गर्दी केली आहे अनेक दुकानदार व ग्राहक बिनधास्त विना मास्क बाजारात वावरत आहे सोशल डिस्टनसिंग चा कुठेच पत्ता दिसत नवहता मलकापूर पांगरा येथील बाजार हा प्रसिद्ध बाजार आहे येथून जवळच असलेल्या हनवतखेड , आंबेवाडी , सेंदुर्जन , साखरखेर्डा येथे अनेक करोना चे रुग्ण असून आज भरलेल्या बाजारात बाजारात या गावातून व्यापारी व ग्राहक ही आलेले आहेत, नुकतेच जिल्हाधिकारी यांनी आठवडी बाजार संदर्भात एक आदेश काढले असून या आदेशात आठवडी बाजार भरवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असे असतानाही आज येथे आठवडी बाजार भरला होता सोशल डिस्टनसिंग चा कुठे ही थांगपत्ता नवहता येथील आठवडी आम्ही तहसिलदार संतोष येवलिकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही संवर्ग विकास अधिकारी किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शासना तर्फे आठवडी बाजार बंद आहे मलकापूर येथे बाजार भरला असेल तर मी माहिती घेतो असे त्यांनी सांगितले ,