
चीखली ,
दि.१५ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता मा. आमदार राहुल बोंद्रे यांच्या माध्यमातून चिखली येथील मौनीबाबा मठ येथे रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी निवेदनाद्वारे एकल महिला शिक्षिकांचा संवर्ग १ मध्ये समावेश करून बदल्यामध्ये रिक्त जागांवर स्वतः च्या तालुक्यात प्राधान्य देण्याची मागनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षीकांच्या बदली दरम्यान त्यांना मिळालेल्या जागा महिलांच्या दृष्टीने व भौगोलिक दृष्ट्या असुरक्षित असल्याने ज्या प्रमाणे शासनाने,अपंग,पती पत्नी एकत्रीकरण व ५३ वर्षा पुढील शिक्षकांचा विचार करून प्राधान्य नकार अधिकार ई. गोष्टींचा लाभ दिला होता परंतु २७/२/२०१७ च्या शासन निर्णयांवे अनेक एकल महिला शिक्षिका विस्थापित झाल्या होत्या त्यांना त्यामध्ये गरोदर माता,स्तनदा माता ,तसेच आजारी महिला यांना विस्थापित होऊन स्व तालुक्यापासून दुसऱ्या तालुक्यात अतिशय दुर्गम भागामध्ये नियुक्त्या दिल्या होत्या,सदर ऑनलाईन बदलीचा शासन निर्णय हा महिलांवर अन्याय करणारा असल्याने सदर एकल महिलांना दुर्गम भागातून स्व तालुक्यात नियुक्ती देण्यात यावी व महिला शिक्षिकांना भौगोलिक दृष्ट्या व त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कमीत कमी अंतरावरील स्वतः च्याच तालुक्यात नियुक्तया दयाव्या जेणे करून एकल महिला शिक्षकांवर झालेला अन्याय दूर होईल, निवेदनात त्यांनी शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांना आपण ही एक महिला असून आपले शासन हे महिलांच्या दृष्टीने सकारात्मक विचार करेल अशी आशा व्यक्त केली, सदर विषयी प्रशांत ढोरे पाटील यांनी मा. कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्फत दि, २८,०५,२०१८,रोजी माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ग्राम विकास मंत्री पंकजा ताई मुंढे यांना निवेदन दिले होते व परत दि २८/५/२०१९ रोजी स्मरण पत्र देखील दिलेले होते परंतु त्यावर अद्याप ही योग्य ती उपाययोजना झालेली नाही म्हणून आपण या विषयात लक्ष घालून सदर एकल महिला शिक्षिकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी एका निवेदनद्वारे केली आहे,यावेळी मा. आमदार राहुल बोंद्रे, रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,राम सुरडकर, डॉ.अमोल लहाने,पवन चव्हाण,दत्ता खान्डेलवाल,खुशाल शिरभाते आदिंची उपस्थिती होती.











































