
कोरोना योद्धा पत्रकारांना मालेगांवचा काढा वाटप
स्वातंत्र्यदिनी जमीअत उलेमा-ए-हिंदचा उपक्रम
अमीन शाह
बुलडाणा :
कोरोना संसर्गाच्या संकटकाळात जिल्हा यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याऱ्या पत्रकारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येथील जमीअत उलमा -ए- हिन्द बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने आरोग्यवर्धक मालेगावचा प्रसिद्ध मंसूरा काढयाचे वाटप पत्रकार भवन येथे करण्यात आले आहे.
बुलडाणा शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुने थैमान घातले असून कहर केला आहे. दोन हजारावर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली.आहे यात दिवसभर फिरून बातम्या कव्हर करणारे काही पत्रकार ही या रोगाच्या कचाट्यात सापडले असल्याचे दिसून आले अश्या भयनकर कोरोना माहामारीच्या काळात मात्र कोरोना योद्धयाची भूमिका पार पाडत रस्त्यावर उतरलेला पत्रकार आपली नैतिक जबाबदारी म्हणून जनतेपर्यंत प्रत्येक घटनेची बातमी पोहोचवत असतो . या कोरोना योद्धांची प्रतिकार शक्ति वाढ़ावी व या करोना विषाणू पासून त्यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे या उद्देशाने बुलडाणा शहरातील सर्व पत्रकार बांधवांना जमीयत उलेमा-ए-हिंद,शाखा बुलडाणा जिल्हाच्या वतीने मालेगांवचा प्रसिद्ध मंसूरा काढा वाटप करण्यात आला आहे.हा काढा महेफिल-ए-यारां ग्रुप मालेगांवच्या वतीने जमीअतला देण्यात आला होता.पत्रकार भवन येथे काढा वाटप करतांना जमीअत उलेमा चे बुलडाणा जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलीलउल्लाह,उपाध्यक्ष मौलाना ज़िया,हाफिज़ इरफान,अंसारी मो मतीन,हाफिज़ अफरोज़ व इतर या वेळी उपस्थित होते ,
फोhttps://youtu.be/AdXUWtzmpd0टो कैप्शन :-
पत्रकार बाँधवांना मालेगांवचा काढा वाटप करतांना जमीयतचे जिल्हाध्यक्ष हाफिज़ खलीलउल्लाह.











































