
स्थानिक गुन्हे शाखे ची कामगिरी ,
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ,
प्रा , तंजिम हुसेन ,
बुलडाणा ,
पोलीस स्टेशन बोराखेडी च्या हद्दीत फेब्रुवारी 2019 मधे लोकांना पैशाचे पाऊस पाडण्याची आमिष दाखवून नकली बनावटी नोटा देऊन तोतयागिरी करणारी टोळीतील एक आरोपी 2019 मधे स्थानिक गुन्हे शाखा ने अटक केले होते.. 5 आरोपी दीड वर्षापासून फरारी झाले होते. आज गुप्त बातमीच्या आधारे मोठ्या शिताफीने पोलीस निरीक्षण महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इम्रान इनामदार यांच्या पथकाने आरोपी 1) विजय तुकाराम गायकवाड रा. सुंदरखेड 2)शेख सत्तार शेख जब्बार रा किन्होळा 3)मो शारिक अ. हक रा.बारा भाई मोहल्ला चिखली 4)तुळशीराम बाळू चौहान वय 59 रा मोहेगाव यांना सापडा रचून गुन्ह्यात वापरलेली swift dezire कार एक motor cycle सह अटक करून पुढील कार्यवाही साठी मा. कोर्टाच्या समक्ष हजर केले . सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक इम्रान इनामदार, अनील भुसारी, साजिद शेख, गीता बामंदे, दिपक पवार, नदीम शेख, संभाजी असोलकर यांनी केली.सदर टोळीने जिल्ह्यात व जिल्ह्याचे बाहेर अश्या प्रकार चे किती लोकांना फसवणूक केलीली आहे याची सखोल चौकशी इनामदार यांचा पथक करत आहे…
अनेक टोळ्या कार्यरत ,
बुलडाणा जिल्ह्यात पैशाचा पाऊस पडणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत असून ते मोठ्या शहरात जाऊन तेथील लोकांना दुप्पट पैसे करून देणे पैशाचा पाऊस पाडणे , बनावट नागमनी दाखवून लुटणे बनावट तांत्रिक बनून भसम पावडर व्दारे बनावट सोने तय्यार करून नुकतेच औरंगाबाद कन्नड पोलिसांनी कार्यवाही करून डोनगाव व साखर खेर्डा येथून आरोपींच्या मुसक्या अवळल्या आहेत , अनेक टोळ्या कार्यरत असून त्यांना गजाआड करणे गरजेचे आहे ,











































