Home मराठवाडा घनसावंगीत भाजप व रासपच्या वतीने दुध एल्गार आंदोलन

घनसावंगीत भाजप व रासपच्या वतीने दुध एल्गार आंदोलन

162

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – घनसावंगी विधानसभा येथे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री व परतूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जुन बसस्टँड घनसावंगी येथे भारतीय जनता पार्टी व रासप च्या वतीने दुध एल्गार आंदोलन करण्यात आले PSI माने साहेब व तहसीलचे मंडळ अधिकारी कोरडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात 1) दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रू अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे 2) दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो 50 रू अनुदान द्यावे 3) गाईच्या दुधाला 30 रू चा दर द्यावा.
जर या आंदोलना बाबत सरकार गंभीर नसेल व दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही हा इशारा या आंदोलनात देण्यात आला यावेळी निवेदन देताना भाजपा घनसावंगी विधानसभा प्रमुख रमेश महाराज वाघ,भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलास शेळके,गोविंद ढेंबरे,रासप ता.अध्यक्ष तुळशीराम कोरडे, रासप युवा ता.अध्यक्ष गजानन वायसे,भास्कर पांढरे,योगेश ढोणे,एकनाथ महाराज राठोड,सुरेश उगले,सुरेश पोटे,अर्जुनराव माळोदे,कांता वराडे,रमेश काळे,बाळासाहेब बोरकर,प्रकाश गहिरे,गणेश मोटे, बप्पा देवडे,नाना सोळंके, सिद्धेश्वर भाणुसे,किशोर गिराम,राहुल काळे,नितीन भुतेकर,संभाजी काळे,लक्ष्मण मोटे,नामदेव सोळंके,अर्जुन थेटे,अमोल काळे,संदीप काळे,रामेश्वर काळे,माऊली सानप,दत्ता वाघ्रळ,संजय बरसाले,रामेश्वर गावंडे,मधुकर गुढेकर,विश्वास घुले,अक्रम भाई,लियायत पटेल,नानासाहेब वैद्य,नवनाथ मिठे,अफरोज बागवान,भगवान ढेरे,उत्तम ढेरे,बलिभाऊ शिंदे,मारोती भालेकर, कैलास भालेकर,गजानन वाघ,हरिभाऊ मिसाळ,विजय खिल्लारे,विशाल वडे,विजय भालेकर, सतिष कैलासराव परदेशी डिगाबर मस्के ढेरे,दिनकर वाघ,शरद नागरे व मोठ्या संख्येने उपस्थित भाजपा कार्यकर्ते.