
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
इंगोले परिवाराचा आदर्श उपक्रम..!
वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आगरगांव येथील भवानी मंदिर टेकडी, येथे कुसूमबाई इंगोले परिवार आणि मानव समाज विकसन संस्थेमार्फत देहदानी रामभाऊजी इंगोले स्मृत्यर्थ १२ वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.
याप्रसंगी वड,गुलमोहर,उंबर, बेल यांची प्रत्येकी एक ;आंबा व चिंच यांची प्रत्येकी दोन तर ४ कडूनिंब अश्या एकूण १२ वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्ष संरक्षक कठड्यांवर “ना ही अपने धर्म से, ना ही अपनी जाती सेI
प्यार करो देश से, और इन्सानियत सेI ” अश्या सामाजिक ,राष्ट्रीय व मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यात आला. यापूर्वी देवळी आणि परिसरात इंगोले यांनी वृक्षसंरक्षक कठड्यांसह वृक्षारोपन केलेली डेरेदार १०५ वृक्ष आहेत.आजच्या वृक्षारोपनाने हा आकडा ११७ पर्यंत गेला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मानसोपचार तथा संमोहनतज्ज्ञ अजय इंगोले यांनी पूर्ण टेकडीचा परिसर विविध उपयोगी तथा वनौषधी वनस्पतींनी युक्त करण्याचे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शारीरिक अंतर ठेवून भवानी मंदिर कमेटीचे अध्यक्ष प्रवीण राऊत, उपाध्यक्ष प्रशांत भोगे तथा इतर काही सदस्य आणि इंगोले परिवारातील अजय, सौ. योगिता, मोहन, सौ.ज्योती, सौ.रुचिता,सचिन, मानवी, प्रेरणा, सुमेध तर गुजर परिवारातील डॉ.आशिष, कार्तिक व प्रियांशू यांनी वृक्षारोपण केले.











































