Home विदर्भ आज 9 कोरोना बाधित रुग्णांची भर

आज 9 कोरोना बाधित रुग्णांची भर

26
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 26 :- जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांचे निदान होत असून आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात वर्धा- 5, आर्वी -3 आणि सेलू मधील एका रुग्णाचा समावेश आहे.
बाधित रुगणांमध्ये वर्धा शहरातील गांधी नगर मधील 4 रुग्ण आहेत, यात 40 व 22 वर्षीय पुरुष आणि 45 आणि 29 वर्षीय महिला तसेच बालाजी वार्ड मधील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आर्वी मधील एक पुरुष 67 वर्षे , एक 22 वर्षीय युवती, निमगाव येथील 75 वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातील घोराड येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे
या नवीन रुग्णांसहित जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 132 झाली आहे. तसेच ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 63 आहे.

Unlimited Reseller Hosting