Home नांदेड संचारबंदी शिथिल होताच बाजारपेठेत गर्दी उसळली

संचारबंदी शिथिल होताच बाजारपेठेत गर्दी उसळली

89

सगरोळी प्रतिनिधी

नांदेड – जिल्ह्यात संचार बंदीत शिथीलता केली असल्याने सगरोळी येथील बाजार पेठेत व बँकांसमोर लोकांची गर्दी उसळली. त्यामुळे कोरोना प्रार्दुभावास पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात पोहचलेल्या कोरोना संक्रमणाने अनेक गावात आपले बस्तान बनवले असतांना सगरोळी येथे मात्र अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.यामुळे कोरोनाचा शिरकाव होऊनये म्हणून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु सगरोळी हे तालुक्यातील मोठे सर्कल असल्याने येथे मोठी बाजारपेठ, बँका, शिक्षण संस्था, दवाखाने, पोस्ट इत्यादी कार्यालये असल्यामुळे परिसरातील दहा ते बारा गावातील लोकांनी जिवनावश्यक वस्तूची खरेदी आर्थिक व्यवहार व इतर खाजगी कामासाठी दररोज येथे मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असल्यामुळे लोकांची नेहमीच वर्दळ असते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात 24 जुलै 2020 शुक्रवार या दिवशी संचारबंदी शिथील करून दुकाने व इतर खाजगी आस्थापना आदेशातील अटी व शर्थीच्या आधीन राहून सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डाँ.विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. शासन निर्णयानुसार सगरोळी येथील स्थानिक प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून व्यापारी, दुकानदार यांची बैठक घेऊन सर्वांच्या सहमतीने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 12 जुलैच्या मध्यरात्री 12 वा. पासुन ते दिनांक 23 जुलैच्या मध्यरात्री पर्यत कडक संचारबंदी लागू झाल्याने लोकांना जिवनावश्यक वस्तू खरेदी व बँकांनी आर्थिक देवानघेवान बंद ठेवल्याने आर्थिक व्यवहार बंद झाले आहे त्यामुळे लोकांकडे पैशाचा तुटवडा पडला होता परंतु जिल्ह्यात संचारबंदी शिथिल केल्यामुळे बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. तसेच येणाऱ्या नागपंचमी या सणाच्या खरेदीसाठी सगरोळी गावातील व परिसरातील अनेक खेड्यातून महिला पुरूषांची किराणा दुकान, कापड दुकान व इतर दुकानात मोठी गर्दी दिसून आली यात काही लोकांनी नाकातोंडाला मास्क किंवा रूमालचा वापर करत नसल्याचे दिसून येते व एकमेकात तिन मिटरचे सामाजिक अंतर ठेवत नसल्याने नियमांचे उलंघन होत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची भिती येथील नागरिकांना वाटत असल्याची चर्चा होतांना दिसत आहे.यावर स्थानिक प्रशासन वेळीच लक्ष देऊन कोरोनावर वेळीच आळा घालण्यासाठी अधिक उपाययोजना करावे.असे जनतेतून सांगण्यात येते.