
कुशल भगत
ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची
दोन दिवसात ही तिसरी कारवाई
ऐकुन 5800 रु चा मुद्देमाल जप्त
अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले
या पुढे ही अशीच कारवाई सुरु राहणार – ठाणेदार कात्रे

अकोला – अकोट तालुक्यातील येणाऱ्या रोहनखेड येथे अवैध देशी दारुची विक्री करनाऱ्यावर कारवाई दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांना गुप्त माहिती मिळली कि दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीतील रोहनखेड या ठिकाणी विनापरवाना अवैध देशी दारुची विक्री करत आहे याचं माहीतीच्या आधारे विक्की उर्फे राजेश मनोहर पाटील वय 30 वर्ष रा.रोहनखेड याने अवैध रित्या जवळ बाळगुन ठेवलेली देशी दारुचा 5800 रु चा मुद्देमाल आढळुन आल्याने आरोपी विरुद्ध दारु बंदी कलम 65 (ई) महा.कारवाई करण्यात आली आहे.
दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई पो हे काॅ अरुन घोरमोळे पो काॅ आशिश ठाकुर हे करीत आहेत.










































