Home जळगाव सापडलेली अति महत्वाची कागद पत्रांसह रोख रक्कम केली परत महाराष्ट्र सुरक्षा बल...

सापडलेली अति महत्वाची कागद पत्रांसह रोख रक्कम केली परत महाराष्ट्र सुरक्षा बल जवाना च्या प्रामाणिकपणा

141

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रेल्वे कर्मचारी बालू डवले या व्यक्तीचे आधारकार्ड,पॅन कार्ड,या सह काही महत्वपूर्ण कागद पत्रे तसेच ५ हजाराची रोकड चे पाकीट भुसावळ रेल्वे स्टेशन डी आर एम भागात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मोहसीन पिंजारी फैजपूर सेवा बजावत असतांना बेवारस स्थितीत आढळून आली , असता मोहसीन पिंजारी यांनी आधार पत्र द्वारे संबंधित व्यक्तीला शोधून बालू डवले यांना सुरक्षा बलाचे अधिकारी के एम शिंदे यांचे हस्ते सदर पाकीट रोख रक्कम सह स्वाधीन केले आहे
सुरक्षा अधिकारी कुंदन एम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर येथील सुरक्षा बल जवान मोहसीन पिंजारी यांनी केलेल्या कर्तृत्व इमानदारीचे बालू डवले, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी कुंदन एम शिंदे यांनी अभिनंदन पर कौतुक केले आहे मो ह सीन पिंजारी हे फैजपूर चे पत्रकार सलिम पिंजारी यांचा मुलगा आहे मो हसीन पिंजारी ने केलेल्या या आदर्शचा सर्व स्थरातून अभिनंदन होत असून मोहसीन पिंजारी याचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल भुसावळ येथील युनिट मार्फत बक्षीस साठी अहवाल पाठविण्यात आलेला आहे मोहसीन पिंजारी यांना येथील सुरक्षा अधिकारी कुंदन एम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.