Home नांदेड माहूरच्या कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कातील २० जण क्वारंटाइन

माहूरच्या कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कातील २० जण क्वारंटाइन

243

मजहर शेख

जामा मस्जिद परिसर कन्टेन्टमेंट झोन, काशी विश्वेश्वर मंदिर परिसर बफर झोन !

नांदेड/माहूर,दि:१५:- माहूर कोविड केअर सेंटर मधील एका आयुष्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल दि.१४ रोजी उशिरा पॉझेटिव्ह आल्यानंतर आज सदर कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कातील २० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. निकषांच्या मानकाप्रमाणे थ्रोट स्वब घेऊन तपसणार असून .कोरोनाबाधित डॉक्टरचे निवासी क्षेत्र असलेला जामा मस्जिद परिसर कन्टेन्टमेंट तर शेजारचा काशी विश्वेश्वर मंदिर परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे. कन्टेन्टमेंट झोन परिसरात कन्टेन्टमेंट कालवधीत भाजीपाला, दुध, किराणा नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शुल्क देण्यात येणार आहे. माहूर नगरपंचायत मार्फत परिसर निर्जंतुकिजकरण करण्यात आला आहे.

इंसीडेंट कमांडर माहुर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, पो.नि.लक्ष्मण राख यांना कन्टेन्टमेंट झोन मधील संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.भिसे यांचेवर परिसरातील हायरिस्क व लो रिस्क पेशंट यांच्यासाठी उपाययोजना करणे व अनुषंगिक कामे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन. भोसले यांचेवर कोरोना बाधित व संशयित रुग्णावर उपचार करणे, वेळोवेळी अहवाल जिल्हाधिकारी यांना कळविणे व अनुषंगिक कामे, न.प.मुख्याधिकारी विद्या कदम यांचेकडे परिसरातील होम क्वारंटाइन बाबत मार्गदर्शक सूचनांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत देखरेख करणे, व माहिती दैनंदिन नियंत्रण कक्षात देणे व इतर अनुषंगिक कामे, नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार व अव्वल कारकून संतोष पवार यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवणे व शासनाचे वेळोवेळी येणारे निर्देश अवगत करणे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविणे प्रसार माध्यमांचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणे, नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार तर सहाय्यक म्हणून एस.पी.जुंकूटवार यांनी तहसील कार्यालयातील चालू असलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेऊन नियंत्रण ठेवणे नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणे,कायदा व सुव्यवस्था व इतर अनुषंगिक कामे करणे, नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार व अ.का.व्ही.व्ही जळमकर यांनी प्रतिबंधित क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत पुरवठा विभाग मार्फत सर्व लाभार्थ्यांना अन्नधान्य ई.सुविधा पुरविणे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभग शिक्षण विभाग यांचेशी समन्वय साधून कोरोन या संसर्गजन्य आजाराबाबत माहूर तालुक्यामध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तालुका प्रशासनाच्या ट्वीटर हांडलर, फेसबुक पेज ई वर कोरोन विषयावर संसर्गाच्या अनुशंगाने आवश्यक ती माहिती देणे आदि बाबीच्या जबाबदार सर्व विभागप्रमुखांना वाटून देण्यात आल्या असून तालुका प्रशासन सज्ज झाले असल्याचे तालुका प्रशासनाने प्रेसनोटव्दारे कळविले आहे.