Home विदर्भ यवतमाळ जिल्हयातील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या समन्वयातून प्रशासक नेमणार

यवतमाळ जिल्हयातील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या समन्वयातून प्रशासक नेमणार

236

पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुचना, राजकीय हालचालींना आला वेग…

यवतमाळ – यवतमाळ जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच कोरोनाच्या संकटात निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांमधील समन्वयातून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात जिल्हयातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार असून हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या ग्रामपंचायातींची मुदत एप्रिल ते जून महिन्यात संपणार होती परंतु आता कोरोनाच्या संकटामुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायातींच्या निवडणुका सध्या स्थगित केल्या आहेत. या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायातींचा कार्यकाळ आटोपल्याने आता यवतमाळ जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ नुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हयातील घाटंजी तालुक्यातील २४, झरीमांजरी १४, दिग्रस २२, राळेगाव २८, उमरखेड ३०, केळापूर २६, बाभुळगाव २५, वाणी ४०, पुसद ३६, मारेगाव २०, यवतमाळ ४०, दारव्हा ३०, कळंब ३०, महागाव ३८, नेर २४ तसेच आर्णी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींवर तसेच ह्या शिवाय सप्टेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुध्दा समन्वय करुन प्रशासक नेमण्याच्या सुचना दिल्या आहे.

अशी होईल प्रक्रिया

पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशान्वये जिल्हयातील सोळाही तालुक्यातील शिवसेना, कॉग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस चे तालुका प्रमुख प्रत्येक तालुक्यातील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन प्रशासकांचे योग्य नाव सुचविणार आहे. ही नावे जिल्हा समितीजवळ येईल. यामध्ये जिल्हा समितीचे शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, विश्वास नांदेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग प्रशासकांची यादी फायनल करुन ती पालकमंत्री यांच्याकडे पाठवतील. पालकमंत्री महोदय जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना यादीतील नावांची शिफारस करणार आहे. एखाद्या नावाबाबत एकमत न झाल्यास महाविकास आघाडी जिल्हा समन्वय समितीकडे संबंधीत नाव पाठवून वादाचा निपटारा केल्या जाणार आहे.

योग्य व्यक्तींची निवड होईल

कोरोना संकटात ग्राम पंचायत चे कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी आम्ही योग्य व्यक्तींची प्रशासक म्हणून निवड करण्यासाठी शिफारस करणार आहोत.योग्य व्यक्तीच्या हातात कारभार राहावा तसेच ग्राम पंचायतचे कार्य विस्कळीत होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ना संजय राठोड यांचेकडे आघाडी सरकारमधील शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन्ही पक्षाच्या नेत्यांना, पदाधिका-यांना विश्वासात घेऊन प्रशासकांची अंतिम शिफारस यादी सुपूर्द करणार आहोत.