Home महत्वाची बातमी राज्यात कोरोना संकटात रोजगार देणारे महाजॉब्स पोर्टल सुरु

राज्यात कोरोना संकटात रोजगार देणारे महाजॉब्स पोर्टल सुरु

105

शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्या मागणीचे फलीत…!

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे मानले आभार…!!

यवतमाळ – कोरोना संकटात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणा-या महाजॉब्स पोर्टलचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हयाचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनीच उद्योगाशी संबंधीत स्वतंत्र पोर्टल सुरु करण्याची मागणी मे महिन्यात केली होती. आता हे पोर्टल सुरु झाल्यामुळे कोरोना संकट काळात स्थानिक तरुणांना मोठया प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने बेरोजगार तरुणांनी या पोर्टल चे स्वागत केले आहे.

कोरोना व्हायरस चा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन मध्ये वाढ केली होती. या दरम्यान मोठया प्रमाणात परप्रांतीय मजुर महाराष्ट्र सोडून आपल्या गावाकडे निघून गेले. सरकारने बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी परप्रांतीय कामगार नसल्यामुळे राज्यातील उद्योगधंदे मोडकळीस आले आहे. दरम्यान याच संधीचा फायदा स्थानिक बेरोजगारांना होण्याची शक्यता असल्याने यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी दिनांक 19 मे 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे, उदयोगमंत्री मा. सुभाषजी देसाई व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री संजय राठोड यांना पत्र देऊन लॉकडाऊन नंतर सुरु होणा-या उदयोगांकरीता मनुष्यबळ मिळविण्यासाठी शासनातर्फे संकेत स्थळ सुरु करण्याची मागणी एका पत्राव्दारे केली होती. ह्या विषयाबाबत राज्यात असलेली निकड लक्षात घेत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी तातडीने उदयोग मंत्रालयाला अशा पध्दतीचे वेब पोर्टल सुरु करण्याच्या सुचना केल्या. दरम्यान आता या वेब पोर्टलचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.हे वेब पोर्टल पुढे उद्योगधंदे व कुशल,अर्धकुशल व अकुशल बेरोजगरामधील दरी कमी करण्यासाठी प्रमुख माध्यम ठरणार आहे.

उदयोगांसाठी ठरेल संजीवनी

राज्यात सुरु झालेले वेब पोर्टल उदयोगांसाठी संजीवणी ठरणार आहे. परप्रांतीय मजुर, कामगार निघून गेल्याने नेमके कुशल, अर्धकुशल तसेच अकुशल मनुष्यबळ शोधण्याची मोठी डोकेदुखी उदयोगपतींना करावी लागणार होती. यवतमाळच्या पराग पिंगळे यांच्या सामाजिक जाणीवेतून तसेच कुशल बुध्दीमत्तेतून एक सुपिक आयडीया समोर आली आणि त्यांनी दिलेली सुचना प्रत्यक्ष कृतीत उतरल्याने त्याचा फायदा आता बेरोजगार तरुण तसेच उदयोगपतींना होणार आहे.

बेरोजगारांना होईल फायदा

परप्रांतीय मजुर तसेच कामगार निघून गेल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मी राज्यातील बेरोजगार तरुणांना तसेच उद्योजकांना माहिती होण्याकरीता संकेतस्थळ तसेच अॅप सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उदयोगाशी संबंधीत स्वतंत्र वेब पोर्टल सुरु झाल्याने राज्यातील स्थानिक बेरोजगारांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे तसेच राज्य सरकारचे स्वागत केले आहे.