Home महाराष्ट्र विजेचा शॉक लागुन पोपटखेड येथील ३५ वर्षीय विवाहीत व्यक्तीचा मृत्यु…

विजेचा शॉक लागुन पोपटखेड येथील ३५ वर्षीय विवाहीत व्यक्तीचा मृत्यु…

102

… देवानंद खिरकर ::= अकोट तालुक्यातील ग्राम पोपटखेड येथील सतीश जंगलु वरठे वय अंदाजे 35 वर्ष यांचा दि.5 जुलै रोजी विजेचा शॉक लागुन मृत्यू झाला.मृतकाचे पोपटखेड गावात टायर पंचर चे दुकान असुन काम करत असताना त्यांला विजेचा शॉक लागला होता,त्यांला लगेच अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे.त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन लहान मुले ,आई वडील असा आप्तपरीवार आहे.पुढील तपास अकोट ग्रामीण पो.स्टे.निरीक्षक फड यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करत आहेत.