Home महत्वाची बातमी घाटंजी तालुक्यातील खापरी येथील जुगार अड्डयावर धाड , ३ लाख २१ हजार...

घाटंजी तालुक्यातील खापरी येथील जुगार अड्डयावर धाड , ३ लाख २१ हजार ४३० रुपयाचा मुद्देमाल जप्त

113

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०३ :- घाटंजी हद्दीतील मौजा खापरी येथे सचिन साबापुरे यांचे घराच्या वरच्या मजल्यावर काही ईसम पैशांचे बाजीने पत्ता जुगार खेळत असतांना यवतामळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १४ आरोपींना अटक करुन ३ लाख २१ हजार ४३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी ही कारवाई दिनांक २ जुलै रोजी केली.
स्थानिक गुन्हे शखेतील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे त्यांचे पथकासह दिनांक २ जुलै रोजी पांढरकवडा उपविभाग परिसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांचे पथकाला मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन घाटंजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे खापरी येथे सचिन साबापुरे याचे घराच्या वरच्या मजल्यावर काही ईसम पैशांचे बाजीने पत्ताजुगार खेळत आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळल्याने पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी घाटंजी पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे यांना सोबत घेवून स्टाफ व पंचासह मौजा खापरी येथे जावून छापा कारवाई केली असता एकुण १४ ईसम एक्का बादशाहा नावाचा हारजीतचा जुगार खेळ खेळत असतांना मिळुन आले.
सदर जुगार खेळणार्या एकुण १४ आरोपीतांकडून जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य गंजीपतता जप्त करण्यात आले असून त्यात नगदी ५१ हजार ३३० रुपये व ६० हजार रुपये किंमतीचे १२ मोबाईल, ६ मोटार सायकल किंमत २ लाख १० हजार रुपयाचा असा एकुण ३ लाख २१ हजार ४३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुध्द घाटंजी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कार्यवाही नोंद करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे तसेच सहाय्यक फौजदार साहेबराव राठोड, महेश पांडे, सुरेंद्र वाकोडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.