Home विदर्भ तलावफैल सबस्टेशनद्वारे मनमानीपण होतोय वीजपुरवठा खंडित विजेअभावी 52 क्षेत्रातील लघु उद्योजकांना सहन...

तलावफैल सबस्टेशनद्वारे मनमानीपण होतोय वीजपुरवठा खंडित विजेअभावी 52 क्षेत्रातील लघु उद्योजकांना सहन करावा लागतोय आर्थिक नुकसान

205

52 रहिवासी क्षेत्रातील नागरिकही विजेअभावी त्रस्त…

यवतमाळ शहरातील तलाव फैल सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या तब्बल 52 क्षेत्रातील हजारो रहिवाशीना दररोज घरगुती व लघु कुटीर उद्योग,मध्यम उद्योजक व व्यापारी दुकानदारांना व विविध शासकीय,खाजगी कार्यालयांना कामाच्या वेळेवर वीज पुरवठा होत नसल्याने प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. नवीन इलेक्टरीक लाईन टाकण्यासाठी अनेक भागात वीजवितरणाचा टाइमटेबल आखून देण्यात आला,पण याला अर्बन सबडीव्हीजन व तलाव फैल पॉवर स्टेशन कडून बगल देत मनमानीपणे वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार व तलाव फैल सबस्टेशनच्या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे रहिवासी नागरिक व व्यापारी , उद्योजकांना होणाऱ्या या त्रासाला महावितरण कंपनीचे अधिकारी,सबडीव्हीजनल व ज्युनियर इंजिनिअर कारणीभूत असल्याची ओरड सर्वसामान्य जनता , उद्योजक व व्यापारी करीत आहे. विशेष म्हणजे महावितरण सबस्टेशन तलावफैल वर वीज पुरवठ्याचा ओव्हर लोड होत असल्याने शासनाकडून नवीन लाईनसाठी निधीचे प्रावधान करण्यात आले. मात्र हे काम दीर्घ अवधीचे आहे. टेकनिकल दुरुस्ती , तार , पोल , ट्रान्सफारर्मर टाकण्याकरिता काम सुरू करण्यापूर्वी वीज खंडित होऊ नये यासाठी तलाव फैल सबस्टेशनच्या इंजिनीअर व अधिकारी व ठेकेदारांनी पूर्णवेळ वीज वितरणसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्थाच केली नाही आणी सोबतच वीज खंडित होऊ नये व ओव्हर लोडकमी करण्यासाठी लाईन डायव्हर्ट करून इतर सबस्टेशनसोबत सबस्टिट्यूट कनेक्टिव्हिटीकरिता सुविधा निर्मित केली नाही. त्यामुळे या मनमानी,हलगर्जी व कामचुकार धोरणाने आता तलाव फैल,मेन लाईन, पाटीपुरा,अंबिकानगर,इस्लामपूरा, कळंब चौक, छोटी गुजरी,प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ) तायडे नगर,समनानी लेआऊट,कुंभारपुरा,अल कबीर नगर , डोर्ली,नागपूर रोड,पांढरकवडा मार्गावरील अनेक रहिवासी क्षेत्र व कार्यालयीन भागात दररोज मनमानीपणे वीज खंडित केल्या जात आहे.या भागात 6 ते 8 तास वीज पुरवठा खंडित करून लाईन दुरुस्तीच्या नावाने नागरिकांना व उद्योजकांना एकाप्रकारे त्रास देण्याचेच काम सबस्टेशन कडून सुरू असल्याचे दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे कॉटन मार्केट चौक धामणगाव मार्गावर इमेर्जेन्सी वीज वितरणासाठी 300 लाईनची लाईव्ह व स्टँड केबल लाईन होती,मात्र ती खराब झाल्याने मागील 8 महिन्यापासून बंद आहे,त्याला दुरुस्त करण्याची तसदीही इंजिनिअर व कर्मचारिनी घेतली नाही,त्यामुळे नवी लाईन पर्यायी वीज पुरवठा करण्यासाठी हा वीज कनेक्शन पॉईंट कामी आला नाही.परिणामी आता घरगुती,लघु व उद्योजकाना वेळेवर वीज और पुरवठा होत नसून याला जबाबदार सबडिव्हिजनल अभियंता व त्यांच्या अधिनस्थ पॉवरस्टेशनचे इंजिनीअर श्री डांगे असल्याची ओरड होत आहे.महत्वाचे म्हणजे तलाव फैल सबस्टेशनशी जुळलेल्या या वरील सर्व भागात 33 केव्ही नवीन इलेक्टरीक लाईन,ट्रान्सफॉर्मर,डीपी टाकण्यासाठी निधी आला पण एमएसईबी प्रशासनातील इंजिनिअर व अधिकारीमध्ये कामामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. मनमानीपणे लाईन दुरुस्तीचे कामकाज व अघोषित लोडशेडिंग करीत सर्वसामान्य नागरिक रहिवासी भागात वीज आपुर्ती बंद केली जात असून विजेअभावी उद्योजक व व्यापारी वर्गाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.तलाव फैल स्टेशन येथील सहायक अभियंता
डांगे यांच्याकडे दुरुस्ती व नवी लाईन टाकण्याची जबाबदारी आहे,कामासाठी टाइम टेबल बनवून सकाळी 8 ते 1 असा वीज पुरवठा खंडित करण्याचा वेळ ठरविल्यानंतर अनेक वेळा दुपारी 4 ते संध्याकाळी 5,6 पर्यन्त वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे.
विशेष म्हणजे आधीच 3 महिन्यापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने लॉकडाऊन सुरू होता,यात उदयोगधंदे पूर्णपणे बंद असल्याने वरील भागातील मध्यम व लघु उद्योजक,व्यापारी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.आता जसे तसे या लोकांचे काही प्रमाणात कामकाज सुरू झाला मात्र वरील सर्व भागात वीज वितरण योग्यरित्या होत नसल्याने ते पुन्हा या नवीन अडचणीत अडकलेत.

महावितरणच्या सबस्टेशन या हलगर्जी कामकाजामुळे नागरिक,कारखानदार व व्यापारींचे व शासकीय व खाजगी कार्यालयात विजेअभावी तासनतास काम ठप्प पडत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे.वीज महावितरण कंपनीच्या तलाव फैल या सबस्टेशनच्या कामकाजामुळे झालेला नुकसान पाहता आता वीज विभागाविरुद्ध उद्योजक व व्यापारी कोर्टात जाऊन दाद मागण्याच्या मनस्थितीत आहे.सुरळीत वीजपुरवठा व कामकाज न सुधारल्यास नागरिकांकडूनही तलावफैल सबस्टेशन विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा आता देण्यात आला आहे.