July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

पत्नी ची मांगणी पती पूर्ण करू शकला नाही मग पत्नीने केले असे कृत्य पाहणारे ही झाले आश्चर्यचकित ???

अमीन शाह

नागपूर – सध्या लॉकडाऊनमुळे नैराश्यामुळे प्रत्येक जणाला काही प्रमाणात का होईना गाठलेले असून अशात करमणुकीचे निरनिराळे प्रकार लोक शोधत आहेत . अशावेळी सर्वात चांगली करमणूक करणारा कोण असेल तर लाडका टीव्ही ,मात्र घरात टीव्ही देखील नाही आणि नवऱ्याला टीव्ही घेण्याविषयी सांगून सांगून वैतागलेल्या एका महिलेने चक्क स्वतःही विष घेतले आणि सोबतच आपल्या दोन मुलांना देखील विष पाजले. काळजाचा थरकाप उडवणारी ही बातमी नागपूरच्या वाठोड्यातील न्यू गणेशनगर भागात उघडकीस आली असून मिर्झा आयशा नसीम बेग (वय ३२) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

आयशा हिचे पती नसीम बेग यांचा दुधाचा व्यवसाय आहे. किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मागील तीन महिन्यांपासून आयशा ही घरात टीव्ही घेण्यासाठी नसीम यांच्याकडे तगादा लावत होती. मात्र सध्या परिस्थिती नाही म्हणून ते वेळ मारून नेत होते . घरात करमणुकीचे काही साधन नसल्याने आयेशा हिला नैराश्याने ग्रासले होते मात्र नसीम यांना टीव्ही घेणे जमत नव्हते .

काही दिवसांपूर्वी आयशा हिनं पुन्हा एकदा नसीम यांना टीव्हीबाबत विचारणा केली होती मात्र आर्थिक कुवत नसल्याचे तेच ते कारण ऐकून ती वैतागलेली होती. मात्र आता तिचा संयम सुटला होता. नसीम हे टीव्ही घेणार नाहीत, असा समज तिच्या मनात पक्का झाला होता . तिने नवऱ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आणि अखेर या भांडणाचा राग मनात धरून आयशानं अमन व हबीबा या आपल्या दोन मुलांना विष पाजलं. मुलांना विष पाजल्यानंतर ती स्वत:ही प्यायली. काही वेळातच तिची आणि मुलांची शुद्ध हरपली आणि त्यांना त्रास सुरु झाला.

पतीने हे पाहिल्यावर तात्काळ त्यांना तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं. या तिघांवर सरकारी वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चिमुकल्या हबीबाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी आयशा हिच्यावरुद्ध हत्येचा प्रयत्न व आत्महत्येचा प्रयत्न केल्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!