July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

“चांगली बातमी-सकारात्मक विचार” ,जळगाव कोविड केअर युनिट तर्फे आज मंगळवारी सफाई कामगार व त्यांच्या परिवारासाठी वैद्यकीय शिबीर

रावेर (शरीफ शेख)

इस्लाम मध्ये स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कोणत्याही प्रकारच्या अन्याय व अतिरेकाची परवानगी दिली जाऊ शकत नाही मग त्याचा धर्म किंवा श्रद्धा कोणतीही असो. मानवाचा हा नैतिक अधिकार आहे की त्याच्यासोबत न्यायपूर्ण व्यवहार केला जावा आणि आणि इस्लामची तर ही मान्यता आहे की संपूर्ण मानव जात हजरत आदम अलै असलाम यांची संतती आहे. सर्वांची जातकुळी एकच आहे. आणि या आधारावर कोणत्याही प्रकारच्या भावाचा प्रश्नच उत्पन्न होत नाही.
अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लाल्लाहू अलेही वसल्लम यांनी त्यांच्या अंतिम हज यात्रेच्या प्रवचनात स्पष्टपणे सांगितले आहे की “कोणत्याही अरबी ला कोणत्याही आरबेतरा वर वा कोणत्याही अरबेतरावर वा कोणत्याही अरबेतरला कोणत्याही अरबावर किंवा कोणत्याही गोऱ्याला कोणत्याही काळ्यावर वा कोणत्याही काळ्याला कोणत्याही गोऱ्यावर श्रेष्ठता प्राप्त नाही’ इस्लाम मध्ये मोठेपणा व श्रेष्ठता याचा आधार फक्त तकवा म्हणजे ईशभय वर आहे. म्हणजे माणूस आपल्या जीवनात परमेश्वराला किती भितो आणि त्याच्या आदेशानुसार किती पवित्र, स्वच्छ न्यायसंगत आणि संयमित जीवन व्यतीत करतो, यावरच श्रेष्ठता अवलंबून आहे.

म्हणूनच आज आम्ही आमच्या सफाई कामगार बंधू-भगिनी व त्यांच्या परिवारासाठी सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे सदर वैद्यकीय शिबिरामध्ये सर्व सफाई कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांना आमचे जळगाव चे खरे कोरोना योध्दा बीयूएमएस व बीएएमएस डॉक्टर त्यांची तपासणी करून औषधोपचार देणार आहे.
*या कार्याचे आपण साक्षीदार राहावे म्हणून यासाठी आपण दिनांक 30 जून रोजी दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये शनिपेठ ममुराबाद रोड , हनुमान मंदिराजवळजळगाव येथे उपस्थित रहावे ही विनंती.
मुफ्ती अतीकउर रहमान – गफ्फार मलिक डॉक्टर जावेद शेख- फारुक शेख व रियाज बागवान यांनी कळविले .

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!