Home जळगाव 75 वर्षीय आजी तर 22 वर्षीय नातू यांची कोरोना मात., सज्ज प्रशासन...

75 वर्षीय आजी तर 22 वर्षीय नातू यांची कोरोना मात., सज्ज प्रशासन प्रणाली यंत्रणांमुळेचं सुखरूप त्यांनी कोरोना योध्दांचे मानले आभार….

126

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील 75 वर्षीय आजी, आणि 22 वर्षीय नातू कोरोनवर मात करून सुखरूप पणे घरी परतले, त्यावेळी गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.
आजीचे वय 75 वर्ष पण त्यांनीही कोरोनवर जोरदार इच्छा शक्तीच्या जोरावर मात केली, आजी म्हणाली आमच्या कुटुंबात 4 जणांना कोरोंना झाला होता आणि 4 ही जण कोरोंना मुक्त होऊन घरी परतले आहेत.
कोरोंना झाला म्हणून लगेच घाबरून जाऊ नका, कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसताच त्याची लवकरात लवकर तपासणी करून घ्या,जितक्या लवकर उपचार मिळणार तितक्या लवकर रिकव्हरी होणार म्हणून कोरोंना झाल्यावर त्याला लपवून ठेवू नका, त्यावर उपचार करा….
आणि शक्यतो कोरोंना होऊ नये यासाठी घराबाहेर जाणे, गर्दीत जाणे टाळा, आणि जर जावेच लागले तर मास्क आणि sanitizer चा वापर करा.
तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्य , सज्ज प्रशासन प्रणाली यंत्रणांमुळेचं आम्ही या जिव घेण्या आजारांवर मात करून सुखरूप घरी परतलो, त्यांनी प्रशासनाचं आभार मानले.