July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नांदेड जिल्ह्यात सोमवारी एका मृत्यूची नोंद तर दिवस भरात २ रूग्णांना सुट्टी, व ६ कोविड पाॕझेटिव्ह रुग्णांची भर

नांदेड , दि. २८ ( राजेश एन भांगे ) – कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकुण संख्या 281 झाली आहे.

तर धक्कादायक बाबा म्हणजे आज नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या 17 व्या बळीची नोंद देखील झाली आहे.
सदरील रुग्ण हा पुरुष असून तो नांदेड शहरातील कौठा म्हाडा कॉलनी या भागातील होता, त्या बाधित व्यक्तीचे वय वर्ष 53 सांगण्यात आले आहे.
त्या रुग्णांचा अहवाल सोमवारी दि 29 जून रोजी काही तासापूर्वी जाहीर करण्यात आला होता, सदरील रुग्णाला
शनिवारी दाखल करण्यात आले होते व रविवारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता तर सोमवारी त्याला कोरोना पॉसिटीव्ह जाहीर केल्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याचं नांदेड आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 17 एव्हढी झाली आहे.

सोमवार 29 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 86 अहवालापैकी 79 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर त्यात 4 नवीन बाधित व्यक्ती आढळले होते, पण रात्री उशीर आणखी 11 अहवाल प्राप्त झाले, त्यातील 8 अहवाल निगेटिव्ह तर आणखी 2 रुग्णांनाचा स्वॉब पॉसिटीव्ह आढळून आला त्यामुळे जिल्ह्यात दिवभरात 6 पॉसिटीव्ह रुग्णांची नोंद झाली त्यामुळे एकूण जिल्ह्याचा आकडा 373 वर पोहोचला आहे.

आज सापडलेल्या 6 रुग्णांमध्ये दोन महिला रुग्ण 4 पुरुष रुग्णांचा समावेश आहे, यातील मृत्यू झालेल्या एका 53 वर्षीय पुरुष रुग्णाचा देखील समावेश आहे.

✔️जिल्ह्यात आज सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

⭕️छत्रपती चौक येथील एक पुरुष रुग्ण वय : ५७,

⭕️शिवाजीनगर येथील एक महिला रुग्ण वय : ३२,

⭕️बाफना येथील एक महिला रुग्ण वय: ६०,

⭕️रहेमतनगर (देगलुर नाका) येथील एक पुरुष रुग्ण वय : ५५

⭕️म्हाडा कॉलनी (नविन कौठा) येथील एक पुरुष वय : ५३ (मृत्यू)

⭕️मुखेड येथील एक पुरुष रुग्ण वय : ५५.

आज सापडलेल्या सर्व 6 रुग्णांचा तपशील अशा पद्धतीचा आहे. व यातील 5 बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याच आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

✔️जिल्ह्याची कोरोना अहवालाची माहिती पुढील प्रमाणे आहे :

☑️ आज दिवसभरात 6 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 373 वर.
☑️ दिवसभरात 2 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 281बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️17 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️76 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 4 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ उपचारास्तव 7 रुग्ण औरंगाबाद 1 सोलापूर
येथे संदर्भीत.

उपचार घेत असलेल्या 74 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50 व 55 वर्षाच्या दोन महिला व वय 38,42,67 व 75 वर्षाचे चार बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.
तर 7 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

सोमवार 29 जून रोजी 117 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल, असे नांदेड आरोग्य विभागाचा प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✅️नांदेड आरोग्य विभागाचे महत्वाचे आवाहन!

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!