July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार !

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

सेलसुरा जवळील घटना.

वर्धा , दि. २९ :- नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने फार्महाऊसला बोलवून विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. मौजा सेलसुरा येथील शेताच्या आवारात ही संतापजनक घटना उघडकीस आला असून 6 जणांनी पीडित महिलेचा एक एक करून विनयभंग केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आणखी एक बाब असल्याचीही माहिती आहे.सवांगी पोलिस सर्व बाबींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी (रेल्वे) येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेला नोकरीचे आमिष देण्यात आले, शनिवारी 27 जून रोजी तिला सेल्सुरा येथील शेतकी शाळेजवळील फार्महाऊसमध्ये बोलविण्यात आले. सुमारे 6 जण उपस्थित असलेल्या फार्महाऊस येथे पोचल्यावर त्यांनी विवाहित महिलेच्या नवऱ्याला आधी बाहेर बसण्यास सांगितले आणि त्यानंतर महिलेस खोलीत बोलावले, एवढेच नव्हे तर पतीला धमकावून दोरीने बांधले. यानंतर प्रत्येकाने एक-एकाने या विवाहित महिलेवर बलात्कार केला.
ही घृणास्पद घटना घडल्यानंतर आरोपीने कुणालाही काही सांगितल्यास विवाहित महिलेला आणि तिच्या नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली, सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर पीडित महिला व तिच्या नवऱ्याने त्यानंतर देवळी पोलिस ठाणे गाठले, देवळी पोलिसांनी त्यांना लवकरच सावंगी येथे जाण्याचा सल्ला दिला आणि त्याच वेळी देवळी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. फार्महाऊसच्या खोलीत काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाही सुरू केली.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!