July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

आहो तुम्हाला मुलगी झाली ???? हे ऐकताच त्याने केले भलतेच काही

अमीन शाह

मुलगी झाली म्हणून एका बापाने रुग्णालयातच पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. त्याला अडवण्यास गेल्या सुरक्षारक्षकालाही त्याने मारहाण करत डोक्यात दगड मारून जखमी केले. डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी अर्चना कृष्णा काळे ही महिला दाखल झाली होती.

आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी कृष्णा काळेला मुलगी झाल्याची बातमी दिली. पण, मुलगी झाले याचा संताप काळेला झाला. त्यानंतर दारूच्या नशेत त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात धिंगाणा घातला. नवजात बाळाला जन्म दिलेल्या बायकोलाच मारहाण आणि शिवीगाळ केली. त्याच्या या कृत्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीही संतप्त झाले. त्याला अटकाव करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाळू चव्हाण गेले असता त्यांना आरोपी कृष्णा काळे याने दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. बाळू चव्हाण यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथील सिल्वर ज्युबली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!