Home विदर्भ धामणगाव रेल्वे येथील कोरोणा पाॉझिटिव रुग्णामुळे आठवडी बाजार कंटेनमेट झोन घोषित….!

धामणगाव रेल्वे येथील कोरोणा पाॉझिटिव रुग्णामुळे आठवडी बाजार कंटेनमेट झोन घोषित….!

192

प्रशांत नाईक

अमरावती – जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे शहरातील आठवडी बाजार येथिल एक 48 वर्षीय इसमाची कोरोना चाचणी केली असता सदर इसमाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले.

त्यामुळे धामणगाव शहरात व धामणगाव रेल्वे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचे व चांदुर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आठवडी बाजार परिसर सीलबंद करण्यात आला असून सदर परिसराला कंटेनमेंट झोन परिसर म्हणुन घोषित केले असुन परिसरातील लोंकानी घाबरुन न जाता ध्येर्य ठेवावे अशी माहिती स्थानिक नगरपरिषद चे आरोग्य निरीक्षक श्री. राजु पठाण यांनी दिली.