July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

सर्वत्र बाप दिवस साजरा होत असतांना त्यांनी पुसला आपल्या आईचा कुंकू

दोन मुलांनी केली बापाची हत्या

अमीन शाह

लातूर – सर्वत्र आज पितृ दिवस साजरा करण्यात येत असताना या दिवसाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडली आहे. Fathers Day दिवशी जन्मदात्या पित्याचा मुलाने खून केल्याचे समोर आलं आहे. असाच प्रकार चाकूर तालुक्यातही घडला असून फादर्स डेच्या दिवशीच दोन तालुक्यात दोन पित्यांचा निर्घृण खून केल्याने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही घटना शेतीच्या वादातून घडल्या आहेत. शेतीच्या वादातून दोन पित्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत चारजण जखमी देखील झाले आहेत. शेताच्या किरकोळ वादातून भोसलेवाडीत ही घटना घडली आहे. तर फादर्स डेच्या पूर्व संध्येला लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याचे समोर आले आहे.
निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जीत शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्याने त्यांनी पेरणी सुरु केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्यांचा मुलगा नागनाथ याचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सरु का केली याचा राग त्याच्या मनात होता. यातूनच त्याचे आणि वडिलांचे जोराचे भांडण झालं. या वादात नागनाथ याची मुलं-बायको आणि मेव्हणी यांनी त्याची साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने पित्याला जबर मारहाण केली आणि यात त्यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या चार जणांनाही बेदम मारहाण झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. तर घटनेतील सर्व आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात काल संध्याकाळी अशीच एक घटना चाकूर तालुक्यात घडली. शेतीच्या वादातून चाकूर इथल्या माजी पंचायत समिती सभापती मारापल्ले यांचा मुलानेच प्रॉपर्टीसाठी खून केला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून आजच्या दिनी अशी क्रूर घटना घडल्याने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!