
पाहणी करताना शाखा अभियंता गुल्हाणे
देवानंद जाधव
यवतमाळ – तालुक्यातील मांगुळ येथील साखर कारखान्या मागे विजेचा खांब तुटला आहे. खांबाचा तंगावा तोडल्याने आणि खांबालगतच नाली खोदल्याने विजेचा खांब तुटला आहे, त्यामुळे जिवंत विजेच्या तारा ऐन पेरणी च्या दिवसातच शेतात पसरल्याने, शेतकर्यांना मोठा ञास सहन करावा लागला. शिवाय कंपनी चे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची आरणी विभागाचे ऊप कार्यकारी अभियंता राऊत यांना माहिती देण्यात आली. त्यांचे निर्देशानुसार जवळा उपकेंद्राचे शाखा अभियंता गुल्हाणे यांनी घटनास्थळाची पाहनी केली. घटनेस जबाबदार ईसमाची सखोल चौकशी करून कंपनीची नुकसान भरपाई वसुली करण्यात येईल असे गुल्हाणे यांनी सांगीतले, सध्या पेरणी झाली आहे. पाऊस येत नसल्याने, शेतकर्यांना मोटर पंप चालवून पिक वाचवणे महत्वाचे आहे. त्यासाठी विज वितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन,विजेचा तुटलेला खांब बदलवून नविन खांब ऊभा करुन, विद्युत पुरवठा सुरळीत करावा आणि दोषीवर कायदेशीर कारवाई करावी असी परिसरातील शेतकर्यांची मागणी आहे.











































